Horoscope Today 31 October 2024 : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. दिवाळी सुरु झाली आहे. त्यानुसार, आजचा दिवस नरक चतुर्दशीचा आहे. आज पहिली अंघोळ केली जाते.  त्यामुळे सगळीकडे प्रसन्नतेचं वातावरण आहे. अशातच आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी चांगले तर काही राशींसाठी वाईट परिणाम आणू शकतो.आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Today Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस असल्या कारणाने वातावरण प्रसन्न असेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. या काळात कोणताही निर्णय घेताना नीट विचार करुन घ्या. तसेच, घराच्या सजावटीवर पूर्ण लक्ष द्या. 


वृषभ रास (Taurus Today Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज सण असल्या कारणाने संध्याकाळचा वेळ तुमचा मित्रांबरोबर चांगला जाईल. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. दिवाळी असल्या कारणाने घरात प्रसन्नतेचं वातावरण असेल. तसेच, कामाच्या ठिकाणीही तुमच्यावर कोणता ताण नसणार आहे. आरोग्याच्या बाबतीत समस्या असल्या वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 


मिथुन रास (Gemini Today Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आजच्या दिवसात तुम्हाला तुमच्या मागच्या चुकीचा पश्चात्ताप देखील होऊ शकतो. तसेच, आज कोणाबरोबरही वचन देताना 10 वेळा विचार करा. 


कर्क रास (Cancer Today Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला कोणतंही काम विचारपूर्वक पूर्ण करावं लागेल. तसेच, नवीन घर, प्रॉपर्टी खरेदी करण्याचा तुम्ही विचार करु शकता.आजच्या दिवसात कोणाशीही विनाकारण वाद घालू नका.


सिंह रास (Leo Today Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, प्रगतीचे  आणि उत्पन्नाचे अनेकत स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. मात्र, आज तुमची एखादी वस्तू हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. 


कन्या रास (Virgo Today Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात आज धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. आज तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. 


तूळ रास (Libra Today Horoscope)


तूळ राशीच्या लोकांना आजच्या दिवसात एखादी शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते. तुम्ही जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तसेच, आज तुम्हाला व्यापाराच्या संदर्भात नवीन ऑर्डर मिळू शकते. तसेच, पार्टनरशिपमध्ये व्यवहार करत असताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. दिवाळीचा उत्सव असल्या कारणाने तुमच्या आजूबाजूचं वातावर प्रसन्न असेल. तसेच, आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. जे अविवाहीत आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. 


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तसेच, आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण पू्र्ण होतील. आज तुमची संध्याकाळच्या वेळी जुन्या मित्राशी भेट होईल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने तुम्ही निश्चिंत असाल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तसेच, आजच्या दिवसात धार्मिक स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता.  आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, मित्राच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. तुम्ही एखाद्या कार्याची नवीन सुरुवात करु शकतात.तसेच, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कोणताही निर्णय घेताना किंवा कोणाला पैसे देताना आधी विचार करा. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धनसंपत्तीच्या बाबतीत चांगला असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही आज निश्चिंत असाल. बहिण-भावांबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. प्रगतीच्या अनेक संधी आहेत.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :  


Happy Diwali 2024 Wishes : दिवाळीनिमित्त नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश