Happy Diwali 2024 Wishes : आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा आणि दिव्यांचा असा दिवाळीचा (Diwali 2024) सण सुरु झाला आहे. मात्र, हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे नरक चतुर्दशीपासून (Narak Chaturdashi) दिवाळीला सुरुवात होते. नरक चतुर्दशीच्या दिवसाला 'पहिली अंघोळ' असंही म्हणतात. सण म्हटला की अशा वेळी घरी पाहुणे मंडळी, मित्रपरिवारातील लोक घरी येतात आणि शुभेच्छा देतात. मात्र, आजकालच्या डिजीटलच्या काळात अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र परिवाराला शुभेच्छा देतात. त्यामुळेच या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहेत जे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्र-परिवाराला पाठवू शकतात.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 (Happy Diwali 2024 Wishes) :
1. उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल, दिवाळी पहाट
शुभ दीपावली!
2. स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
3. अभ्यंगस्नानाने झाली पहाट,
दारी रांगोळीचा थाट,
सण आला प्रकाशाचा, दिव्यांची केली रास
चिवडा, करंजी, चकली, फटाकेही खास
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
4. दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन
पर्वावर उघडेल भाग्याचं दार,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
5. लक्ष लक्ष दिव्यांनी
उजळून निघो ही निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
6. फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही
लज्जचच न्यारी
नव्या नवलाईची दिवाळी येता
आनंदली दुनिया सारी...
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
7. जुने जुने विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरुप होऊन
सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
8. लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे!
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो,
लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
9. चंद्राचा कंदील घरावरी
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दीपावली…
10. उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :