NSE News Update मुंबई : भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सनं यंदा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून रक्कम काढून घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र, याच काळात शेअर बाजारात ट्रेडिंग जोरदार सुरु असताना नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं इतिहास रचला आहे. एनएसईवरील क्लाइंट अकाऊंटची संख्या 20 कोटींच्या पुढे गेली आहे. 8 महिन्यांपूर्वी एनएसईवरील क्लाइंट अकाऊंटची संख्या 16.9 कोटी होती. गेल्या 8 महिन्यात एनएसईवरील क्लाइंट अकाऊंटची संख्या वाढली आहे.
महाराष्ट्र अग्रेसर
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार क्लाइंट अकाऊंसच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील अकाऊंटसची संख्या 3.6 कोटी आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात 2.2 कोटी, गुजरात 1.8 कोटी क्लाइंट अकाऊंटस आहेत. राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये 1.2 कोटी अकाऊटस आहेत. या राज्यांच्या अकाऊंटसी बेरीज केली असता ती 10 कोटींच्या पुढे जाते.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं सांगितल्यानुसार यूनिक रजिस्टर्ड इनवेस्टर्स बेस 10.5 कोटींवर पोहोचला आहे. एनएसईनं हा 10 कोटींचा टप्पा 8 ऑगस्टला पार केला होता. एनएसईचे चीफ बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीराम कृष्णन यांनी याबाबत माहिती दिली. गुंतवणूकदारांची संख्या वाढवून आम्ही मोठं यश मिळालं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये क्लाइंट अकाऊंटसची संख्या 17 कोटी होती. गेल्या 8 महिन्यात 3 कोटी खाती वाढली आहेत.
डिजीटल आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धेमुळं हे शक्य झाल्याचं कृष्णन म्हणाले. भारताच्या विकासाच्या वाटेवर गुंतवणूकदारांचा विश्वास महत्त्वाचा आहे. मोबाइल ट्रेडिंग अॅपला लोकमान्यता आणि गुंतवणुकीमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी काम करणार आहोत. डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्यानं लोक शेअर बाजारापर्यंत पोहोचू शकले आहेत. याचा फायदा टियर 2, टियर 3 आणि टियर 4 मधील गुंतवणूकदारांना झाला आहे.
इतर बातम्या :
success story : गगनभरारी! 5000 रुपयांचं कर्ज घेऊन सुरु केला व्यवसाय, आज 400 कोटी रुपयांची उलाढाल