Pune Crime : पुण्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने अशा घटना घडत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत असतानाच गोळीबाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. पुण्यातील वडगाव धायरी परिसरातील सृष्टी गार्डन हॉटेलसमोर गोळीबार करण्यात आलाय. वेदांत भोसले नावाच्या तरुणावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गोळी वेदांतच्या बोटाला स्पर्श करुन गेल्याने त्याला इजा झाली नाही. हा गोळीबार कोणी केला याचा पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.
पुण्यात गोळीबाराच्या घटना थांबता थांबेनात, वडगाव धायरी परिसरातील हॉटेलसमोर तरुणावर फायरिंग
मिकी घई, एबीपी माझा | 30 Oct 2024 09:25 PM (IST)
पुण्यात गोळीबाराच्या घटना थांबता थांबेनात, वडगाव धायरी परिसरातील हॉटेलसमोर तरुणावर फायरिंग