एक्स्प्लोर

Horoscope Today 3 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 3 October 2026 : आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 3 October 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 3 ऑक्टोबर 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमाच्या बाबतीत अहंकार बाळगू नका. तसेच, आजच्या दिवसात कोणताही नवीन निर्णय घेताना सावधानता बाळगा. घराच्या आसपास गाय दिसली तर दान करायला विसरू नका. तुमच्यासाठी लवकर चांगली बातमी आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच नवीन प्रोजेक्ट हाती लागेल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल आणि जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा द्याल. व्यवसायात एखादा करार होऊ शकतो. तसेच, संपत्तीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. मुलांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही महत्त्वाची कामे आज वेळेत पूर्ण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्यापाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखाचे जातील. आज संध्याकाळच्या वेळी पार्टनरला छान भेटवस्तू द्याल. तसेच, तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. या दरम्यान अनेक लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.  

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhanteras 2026 Horoscope: यंदा धनत्रयोदशी 4 राशींना चांगलीच फळफळणार! पॉवरफुल मालव्य राजयोगाने भाग्योदयाचे बक्कळ योग, उत्पन्नवाढ, मोठा आर्थिक लाभ?
यंदा धनत्रयोदशी 4 राशींना चांगलीच फळफळणार! पॉवरफुल मालव्य राजयोगाने भाग्योदयाचे बक्कळ योग, उत्पन्नवाढ, मोठा आर्थिक लाभ?
Diwali 2026 Dates and Muhurat: उद्यापासून दिवाळीला सुरूवात! वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान ते भाऊबीजचे सर्व मुहूर्त, तिथी, धार्मिक महत्त्व अन् बरंच काही....
उद्यापासून दिवाळीला सुरूवात! वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान ते भाऊबीजचे सर्व मुहूर्त, तिथी, धार्मिक महत्त्व अन् बरंच काही....
Diwali Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..उद्यापासून 'दिवाळीचे' 7 दिवस गेमचेंजर, 5 राशींचा भाग्योदय जोरात! पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..उद्यापासून 'दिवाळीचे' 7 दिवस गेमचेंजर, 5 राशींचा भाग्योदय जोरात! पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..उद्यापासून 'दिवाळीचे' 7 दिवस नशीब पालटणारे, 5 राशींची बोटं तुपात,  पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..उद्यापासून 'दिवाळीचे' 7 दिवस नशीब पालटणारे, 5 राशींची बोटं तुपात,  पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
Raju Shetty Agitation: तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
Embed widget