(Source: Poll of Polls)
Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी अशा काही वाईट सवयींविषयी सांगितलं आहे ज्या अंगिकारल्यास आपल्याला आयुष्यभर धनहानीचा सामना करावा लागू शकतो.

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य (Chanakya Niti) यांना भारतातीतल अत्यंत बुद्धिमानी अर्थशास्त्रज्ञ मानतात. त्यांनी आपल्या आयुष्यात मानवाच्या हिताशी संबंधित अनेक नीती तसेच, तत्त्वमूल्ये सांगितली आहेत. तसेच, त्यांनी सांगितलेली नीतिमूल्ये आजही समाजात आचरणात आणली जातात. काही त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला चांगली शिकवण मिळते, तर काहींमधून आपल्याला जीवनाचं कटू सत्य कळतं.
या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात माणसांच्या काही चांगल्या स्वभावाची आणि सवयींची उदाहरणं दिली होती ज्यामुळे व्यक्ती धनवान होतो. त्याचप्रमाणे, या ठिकाणी त्यांनी अशा काही वाईट सवयींविषयी सांगितलं आहे ज्या अंगिकारल्यास आपल्याला आयुष्यभर धनहानीचा सामना करावा लागू शकतो. या सवयी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
इतरांवर अवलंबून असणं
चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जी व्यक्ती आपली कामं स्वत:करण्याऐवजी इतरांवर अवलंबून असतात, ज्या व्यक्ती आत्मनिर्भर नसतात असे लोक आयुष्यात कधीच धनवान होऊ शकत नाहीत. अशा लोकांना आयुष्यभर संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, जे लोक आपली कामं इतरांवर लादतात ते कोणत्याच कार्याच्या बाबतीत सतर्क नसतात. असे लोक कामाच्या ठिकाणी अपयशी ठरवले जातात. त्यामुळेच आपली कामं इतरांवर लादण्याऐवजी स्वत: करण्याचा प्रयत्न करा.
वाणीत कटुता
चाणक्य म्हणतात की, कठोर आणि कटू वाणी आपलं भाग्य अधिक कमजोर करतात. ज्या लोकांच्या बोलण्यात गोडवा नसतो त्यांच्यापासून लोक हळुहळू अंतर ठेवतात. असे लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडतात. ज्यांची वाणी कठोर आणि कटू असते त्यांचं भाग्य देखील तितकंच कमजोर असतं. चाणक्यांच्या म्हणण्यांनुसार, ज्यांची वाणी कठोर असते त्यांच्यावर कधीच देवी लक्ष्मीची कृपा नसते. यासाठीच वाणीत गोडवा असावा. मित्र-मैत्रीणींशी सलोख्याने वागावं. यामुळे जीवनात तुमची प्रगती दिसून येईल.
आळशी लोक
चाणाक्य नीतित आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानण्यात आला आहे. जे लोक आजचं काम उद्यावर ढकलतात त्यांची आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. आळस हा व्यक्तीची क्षमता आणि वेळ नष्ट करुन टाकतो. परिणामी, अशा लोकांना आयुष्यात आर्थिक संकटातून बाहेर येण्यास खूप त्रास होतो. यासाठी आजपासूनच आळसावर मात करण्याचा प्रयत्न करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















