Horoscope Today 29 May 2024 : पंचांगानुसार, आज 29 मे 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
तुम्हाला अपेक्षित असलेली बातमी कानावर पडणार नाही. त्यामुळे थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आपले छंद जोपासण्याची संधी मिळेल. गायन वादन यांसारख्या गोष्टींमध्ये तल्लीन व्हाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
एखाद्या चांगले लिखाणातून घडेल. परंतु सतत द्विधा मनस्थिती राहिल्यामुळे कामाची गती थोडी मंदावेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आपल्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. मानापमानाच्या कल्पना जरा जास्त टोकदार होतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये एक पुसटशी लक्ष्मण रेषा आहे हे लक्षात ठेवा. महिला विसरभोळ्या बनतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
ज्यांच्या नोकऱ्या नवीन आहेत त्यांना वरिष्ठांच्या गैरमर्जीला तोंड द्यावे लागेल. महिला घरामध्ये वेगवेगळे पदार्थ करण्यात गुंतून जातील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
जेवढे काम कराल त्या मनाने व्यवसायात लाभ कमी मिळेल. त्यामुळे थोडी नाराजी येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
घरामध्ये छोट्याशा कारणांनी वाद होतील आणि वातावरण ढवळून निघेल. महिलांनी तब्येत सांभाळावी
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
ज्यांना पित्ताचा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी सांभाळून राहावे. परदेशी प्रवासाचे बेत ठरतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
वडिलोपार्जित इस्टेटि संदर्भात कामे मार्गी लागतील. आर्थिक गुंतवणूक ही कराल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
एखादे घर बांधायला घेतले असेल तर ती कामे पूर्ण होतील. बौद्धिक गोष्टींमध्ये रमाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
एखाद्या निरीक्षण परीक्षण चांगल्या पद्धतीने कराल. त्यामुळे तुमच्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास होईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: