Horoscope Today 28 May 2024 : पंचांगानुसार, आज 28 मे 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


बोलताना विचार करुन बोला. बोलल्यानंतर विचारात पडू नका, नाहीतर कामात अडथळे येतील. 


वृषभ (Taurus Horoscope Today)


जमिनीच्या व्यवहारामध्ये अचानक वेगवेगळ्या संधी चालून येतील आणि फायदा मिळेल. महिला जरा जास्त खर्चिक बनतील. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


आज मनातील सर्व गोष्टी इतरांसमोर उघड करायला पाहिजेत, असं नाही. घरातील कामांमध्ये जास्त लक्ष घालाल.


कर्क (Cancer Horoscope Today)


कुटुंबासाठी जास्त वेळ दिल्यामुळे घरातील लोक खुश राहतील. घरात मनासारख्या दुरुस्त्या करून घ्याल. 


सिंह (Leo Horoscope Today)


लेखकांना लिखाण करायला उत्तम काळ आहे. इतरांच्या सहकार्यामुळे कामे लवकर मार्गी लागतील. 


कन्या (Virgo Horoscope Today)


आज प्रथम स्वतःची कामे उरका. आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल.


तूळ (Libra Horoscope Today)


पित्त विकारापासून सावधान रहा, पथ्य पाणी सांभाळा. विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. नवीन योजना आकारात आणाल. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


महिलांचा आपल्या कर्तृत्वावरील विश्वास वाढेल. अतिशय दयाळू आणि परोपकारी राहाल. 


मकर (Capricorn Horoscope Today)


जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. घरापासून लांब राहण्याचे प्रवासाचे योगही येतील. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


खूप दिवसांपासून धंद्यामध्ये एखादी अवघड वसुली होईल. पैशाच्या अडचणी संपुष्टात येतील. 


मीन (Pisces Horoscope Today)


हाती आलेले पैसे लगेच गुंतवून टाका नाहीतर त्याला अनेक वाटा फुटतील. भावनांशी पटणार नाही.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Rajyog : अवघ्या 5 दिवसांत मंगळ ग्रह बनवणार रुचक राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार, होणार अपार धनलाभ