एक्स्प्लोर

Horoscope Today : वृषभ,  धनु आणि  मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य... 

Horoscope Today : वृषभ,  धनु आणि  मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.

Horoscope Today 26 November 2022 : आज शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022. राशीनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तुमचं आजचं राशीभविष्य नेमकं काय सांगते, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात...


मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. लोककल्याणाच्या कामांशी जोडून तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी चांगला आहे. मेहनत आणि विश्वासाने तुमचे ध्येय पूर्ण करायचे आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर आज काही नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कुटुंबात तुम्हाला वरिष्ठांचा पूर्ण आदर करावा लागेल.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना आज त्यांच्या निर्णयक्षमतेचा फायदा मिळेल. आज जर तुम्ही योग्य नियोजनानुसार काम केलं तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. कौटुंबिक सदस्यांमध्‍ये सुरू असलेले मतभेद तुम्ही आज संपवू शकाल.

कर्क 

बऱ्याच दिवसांपासून काही कामाबद्दल तुम्ही चिंतेत होता, आज ती कामे पूर्ण होऊ शकतात. आज तुम्ही कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखला तर ते तुमच्यासाठी चांगले होईल.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल तर तो संपेल. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून सुटका होईल. तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. शिक्षणाशी संबंधित उपक्रमात सहभागी व्हाल. 

कन्या 

आज कन्या राशीचे लोक कुटुंबात सामंजस्याची भावना वाढवतील. मोठ्यांचा आदर आणि सन्मान करतील.  कोणतीही नवीन मालमत्ता मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. कोणत्याही बाबतीत संयम आणि विवेक ठेवा. आज तुम्हाला मुलांकडून काही आनंददायक बातमी ऐकायला मिळेल.

तुळ

जर तुळ राशीचे लोक राजकीय क्षेत्रात काम करत असतील तर ते पूर्ण झोकून आणि मेहनतीने काम करतील. आपले काही पैसे परोपकाराच्या कामातही देतील. भावांसोबत तुमची जवळीक वाढेल. तुम्हाला तुमच्या विविध कामांमध्ये गती राखावी लागेल. 

वृश्चिक 

आज वृश्चिक राशीच्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आदर राखावा लागेल. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या अत्यावश्यक कामांवर लक्ष केंद्रित करा, तुमची कामे पूर्ण होतील.

धनु 

धनु राशीच्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला राहील. आज तुम्ही काही महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. आज तुमचे मन सुख-समृद्धीने प्रसन्न राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसाठी तुम्ही सरप्राईज घेऊन येऊ शकता.

मकर 

मकर राशीच्या लोकांना आज व्यवहारात संतुलन राखावे लागेल. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक नात्यात मालमत्तेशी संबंधित वाद सुरू असतील तर त्यात तुमचा विजय होईल.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाचा असणार आहे. कार्यक्षेत्रातील लोकांचा विश्वास जिंकून कामे मार्गी लावू शकाल. आज सरकारी नोकरीत काम करणारे लोक एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाऊ शकतात, त्यांची प्रतिष्ठा वाढू शकते. आज तुमच्या जुन्या मित्रांची भेट होईल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. आज नोकरीमध्ये नवीन यश मिळाल्यास तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला वरिष्ठ सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला काही नवीन मालमत्ता मिळू शकते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde Beed: भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मत मतांतरे; आता संजय मंडलिक काय म्हणाले?
कागलमध्ये उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मत मतांतरे; आता संजय मंडलिक काय म्हणाले?
मोठी बातमी : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSaurabh Chandrakar : महादेव बेटिंग ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकरला अटकDevendra Fadnavis Banner : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप महाराष्ट्रात हॅटट्रीक करणारNashik Shreeram Statue : सर्वात उंच श्रीरामाच्या मुर्तीचं लोकार्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde Beed: भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मत मतांतरे; आता संजय मंडलिक काय म्हणाले?
कागलमध्ये उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मत मतांतरे; आता संजय मंडलिक काय म्हणाले?
मोठी बातमी : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
Ajit Pawar: अजित पवारांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली, महायुतीच्या नेत्यांकडून अजितदादांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न: विजय वडेट्टीवार
अजित पवारांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली, महायुतीच्या नेत्यांकडून अजितदादांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न: विजय वडेट्टीवार
Pune Car Accident: कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
Nashik : नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
Embed widget