Horoscope Today 23 June 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 23 June 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 23 June 2024 : पंचांगानुसार, आज 23 जून 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
घरामध्ये काही दुरुस्तीची कामे निघते त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. केवळ भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
दुसऱ्या मधील गुण पाहिले तर मानसिक त्रास कमी होईल. महिलांनी स्वतःच्या मनाचा कौल घेणे आवश्यक ठरेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
परदेश का मनाची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य प्रयत्न करावेत. प्रवासाचे योग आहेत.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कामे करून घेण्यासाठी पैशाचा व्यय संभवतो. विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागावे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य उत्तम मिळेल. स्वतःच्या नादात राहिल्यामुळे समोरच्या माणसाच्या सांगण्याकडे पुष्कळदा दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कामाचा वेग प्रचंड वाढवायला हवा. पूर्वी जी ध्येयधोरणे ठरवली असतील त्याकडे पोहोचण्याचा मार्ग दिसेल.
तुळ रास (Libra Horoscope Today)
आज परिस्थितीवर मात कशी करायची हे तुम्हाला सांगावे लागणार नाही. महिला यशाला खेचून आणतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
संकटांचा सामना चांगला कराल. परंतु व्यवहाराशी थोडी फारकतच झालेली दिसेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कल्पनाशक्तीच्या भराऱ्या जरा जास्तच माराल. त्यामुळे विचार काल्पनिक आणि भावनिक होतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी व्यवसायात बौद्धिक भाग जरा जास्तच वापरला तर कामे लवकर मार्गी लागतील. महिला उत्साही आणि आनंदी राहतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
दानधर्म तीर्थयात्रा घडून बरीच धार्मिक कार्य पार पडतील. उपासना चांगली होईल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
अध्यात्मिक जीवनाची आवड निर्माण होईल. कोर्टकचेरीच्या निर्णयात अचानक बदल होण्याच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: