Horoscope Today 22 September 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 22 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर, आज तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खूश असेल, पण तुमच्या ऑफिसच्या कामाशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका.
व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारावर विश्वास ठेवा. भागीदारावर शंका घेऊ नका, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. व्यवसायात प्रगतीच्या संधीही मिळू शकतात.
विद्यार्थी (Student) - उच्च शिक्षणाच्या उद्देशाने तुम्ही परदेशात जाऊन कुठेतरी अभ्यास करू शकता. तुम्हाला अभ्यासाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही मुलीला करिअरच्या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर तुम्ही तिला पाठिंबा देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही सुधारेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचा बीपी कमी होईल. आज तुम्ही तुमचं मन शांत ठेवावं, यामुळे तुमचा बीपी देखील बरा होऊ शकतो. रोज सकाळी प्राणायाम करावा.
वृषभ (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही प्रलंबित कामं संपवून टाका. कोणतं काम आधी पूर्ण करायचे हे आधी ठरवा. अन्यथा, आज गोंधळ उडू शकतो.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नेटवर्क वाढवण्यासाठी लोकांशी संवाद कायम ठेवला तर बरं होईल.
विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यावेळी चुकीचे विचार मनात येऊ देऊ नका, अन्यथा, तुम्ही चुकीच्या संगतीत पडू शकता आणि तुमचं करिअर खराब होऊ शकतं.
कौटुंबिक (Family) - आज जोडप्यांना नवीन पाहुण्याच्या आगमनाची चांगली बातमी मिळू शकते, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, जमिनीवर पडून राहिल्याने तुम्हाला पाठदुखी जाणवू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल, त्यामुळे औषधं घ्या. व्यायामावर जास्त भर दिलात तर बरं होईल.
मिथुन (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक राहील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या कामात नाक खुपसणं टाळावं, यामुळे तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे तुम्ही वादाला बळी पडाल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज ग्रहांची स्थिती लक्षात घेता, व्यावसायिक लोक संपर्काचा चांगला फायदा घेऊ शकतील.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आज कोणत्याही प्रकारच्या वादात न पडले तर बरं होईल. तसंच, कोणाशीही कठोर भाषा वापरू नका.
कौटुंबिक (Family) - आज तुम्ही तुमच्या कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करू शकता, आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याकडे खूप लक्ष दिलं असेल आणि तुमच्या जुन्या आजारांवर उपचार घेतले पाहिजे, तरच तुमचे आजार लवकर बरे होऊ शकतात.
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल, तर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी स्वत: प्रेरित होण्यासोबतच तुम्ही टीमलाही प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून तुमचा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकेल.
व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचाही आढावा घेत राहायला हवं, त्यानंतर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयुष्यात पुढे जाऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्याचं ऐकण्याऐवजी तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीचा वापर केल्यास तुमच्यासाठी चांगलं होईल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. डेंग्यू, मलेरिया इत्यादींचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा.
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं काम पाहता तुमचा बॉस तुम्हाला नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये मेहनतीने काम कराल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज व्यापारी थोडे उदास दिसू शकतात. आर्थिक नुकसान तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते, परंतु काळजी करू नका, हळूहळू तुमची परिस्थिती सुधारेल आणि तुमचा व्यवसायही चांगला चालेल.
विद्यार्थी (Student) - आज करिअरच्या क्षेत्रात घाईघाईने निर्णय घेताना थोडं सावध राहावं लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या, कारण तुम्हाला काही आजार उद्भवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला नंतर खूप काळजी वाटू शकते.
तूळ रास (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. अधिकारीही तुमच्यावर खुश नसतील.
व्यापारी (Business) - व्यापारी वर्गातील जे लोक आहेत त्यांनी आज आपल्या ग्राहकांबरोबर चांगला व्यवहार ठेवावा. अन्यथा तुमच्या व्यवहारात नुकसान होऊ शकतं.
कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणामुळे तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तुम्ही हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना धार्मिक स्थळी घेऊन जा.
आरोग्य (Health) - वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी जास्त दगदग करू नका. शक्य तितकी विश्रांती घ्या.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरदार वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्या. ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवा. घरी त्याबाबत बोलू नका. अन्यथा कुटुंबियांना त्रास होऊ शकतो.
व्यापार (Business) - आज तुमची कामाच्या बाबतीत एखादी डील तुम्हाला अचानक कॅन्सल करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला तणावाचा सामनाही करावा लागेल.
तरूण (Youth) - आज तुमचा तुमच्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. एकमेकांचे मतभेद असू शकतात.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार जसे की, पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे आजच्या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन टाळलं तर बरं होईल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट कळत नसेल तर सहकाऱ्यांचं सहकार्य घ्या.
व्यापार (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्ही तुमचा सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यात व्यस्त असाल. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स देखील मिळतील.
महिला (Women) - महिलांनी आपल्या स्वभावातील रागीटपणा जरा कमी करावा. तसेच, जोडीदाराबरोबर वाद होत असतील तर ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा.
आरोग्य (Health) - सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठी अधूनमधून विश्रांती घ्या. तरंच तुम्हाला बरं वाटेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी (Job) - आज ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
व्यवसाय (Business) - व्यापारात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. समाजात तुमचं कौतुक होईल.
विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला भूतकाळातील जुन्या गोष्टी आठवतील. या गोष्टी आठवून तुम्हाला भावूक व्हायला होईल.
आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणाचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल राहून काम करणं अपेक्षित आहे. अन्यथा लोक तुमच्या स्वभाचा गैरफायदा घेऊ शकतात.
व्यवसाय (Business) - आज तुमचे विरोधक तुमचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही त्यांच्या बोलण्यात फसू नका.
विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यास खूप उत्सुक असाल. आजचा दिवस तुम्ही मनासारखा जगाल.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला अति तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरी (Job) - तुमची निर्णयक्षमता चांगली असल्या कारणाने कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय कंपनीसाठी लाभदायक ठरू शकतात. तुमची जिद्द आणि तुमचे विचार याचं ऑफिसमध्ये खूप कुतूहल असेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गेले अनेक दिवस तुमच्या ज्या कोर्ट-कचेऱ्या सुरु होत्या त्याला आज यश येणार आहे.
विद्यार्थी (Student) - इतरांची जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही तुमच्याच कुटुंबीयांसाठी अडचणी निर्माण करू शकता.
आरोग्य (Health) - तुमची तब्येत ठणठणीत असणार आहे. फक्त कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :