Horoscope Today 22 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस खास; कोणते सुखद धक्के मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 22 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
मेष (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल. कुटुंबात सुरू असलेला कलहही संवादातून सोडवला जाईल. तुमच्या कामात भाऊ आणि बहीण तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. जर तुम्ही घर किंवा वाहन इत्यादीसाठी कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला तेही सहज मिळेल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील.
वृषभ (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र जाणार आहे. तुम्हाला कामात समस्या येत असल्यास, त्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या बॉसशी बोलू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. तुमचा एखादा मित्र तुम्हाला खूप दिवसांनी भेटायला येऊ शकतो, तुमच्या मनात कोणताही राग ठेवू नका. राजकारणी लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
मिथुन (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांचं आरोग्य कमजोर असणार आहे. हवामानाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले तर तुम्हाला ते परत मिळण्यात अडचणी येतील, म्हणून एखाद्याला सावधगिरीने पैसे द्या आणि जर तुमचा कोणताही व्यवहार फिक्स झाला असेल तर तो फायनल होऊ शकतो. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Diwali 2024 : यंदा धनत्रयोदशी नेमकी कधी? 29 की 30 ऑक्टोबर? जाणून घ्या पूजनाचा शुभ मुहूर्त आणि विधी