एक्स्प्लोर

Horoscope Today : मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Horoscope Today : आजचा दिवस मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य...

Horoscope Today 21 January 2023 : आज शनिवार दिनांक 21 जानेवारी 2023. आज शनि अमावस्या आहे. आजचा दिवस शनिदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. आजचा दिवस मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. इतरही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य...

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जर तुम्हाला कोणत्याही कामाची चिंता वाटत असेल तर आज महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. आज तुम्ही कोणाची मदत मागितली तर ती तुम्हाला सहज मिळेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी आज कमी होतील. तुम्ही तुमच्या कामात बेफिकीर राहू नका, नाहीतर अडचण येऊ शकते. मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला कायदेशीर बाबतीत सल्ला हवा असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

मिथुन

मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कारण त्यांना आज नवीन संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला काही काळापासून एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल त्यापासून आज तुमची सुटका होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घ्यावा. 


कर्क

कर्क राशींच्या लोकांचे कुटुंबांत आज आनंदी असेल.  नात्यात गोडवा निर्माण होईल. तुमच्यावरील कामाचा ताण आज वाढू शकतो. तुमची शक्ती चांगल्या कामात वापरा, त्याचा तुम्हाला फायदा होईल.
 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शांततापूर्ण असणार आहे. आज एखाद्याच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. तुम्ही विचार न  करता कोणाचाही सल्ला घेणे टाळावे, अन्यथा अडचण येऊ शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त जाणार आहे. जर तुमचे तुमच्या लाइफ पार्टनरसोबत काही मतभेद होत असतील तर ते समंजस संवादातून संपवा. कुटुंबात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. जर तुमचा कोणाशी वाद असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर कोणतीही कारवाई करू शकते.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात व्यस्त जाणार आहे. आज तुम्ही कोणतेही काम करण्यास तयार असाल. जास्त कामामुळं तुम्हाला थकवा येऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून आणि नातेवाईकांचा सल्ला घेतल्यास ते तुम्हाला काही चुकीचा सल्ला देऊ शकतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-समृद्धीमध्ये वाढ करणारा आहे. कोणत्याही विशिष्ट कामासाठी वरिष्ठांशी बोलावं लागेल. घरात आणि बाहेर कोणत्याही कामात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा शांत राहणे चांगले. कायद्याशी संबंधित कोणत्याही प्रकरणात तुम्हाला विजय मिळू शकेल. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे.  आज तुम्हाला कोणताही निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्यावा लागेल, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ कार्यासाठी असेल. तुम्हाला आज अनोळखी व्यक्ती भेटेल, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात जेवढी मेहनत कराल, तेवढे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा आणि त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवण्याचा विचार करू शकता.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही खास असणार आहे. तुम्ही नवीन गुंतवणुकीची योजना करू शकता. कुटुंबात काही समस्या असतील तर त्या बाहेरच्या व्यक्तीशी बोलू नका, अन्यथा समस्या येऊ शकते. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंतेचा असणार आहे. तुम्ही स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी कराल. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांची काही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget