एक्स्प्लोर

Horoscope Today 20 November 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 4 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 November 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 20 November 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 20 नोव्हेंबर 2026 चा आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. आपल्या चुकीच्या गोष्टींबद्दल माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. लवकरच शनि वक्री होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्यातील ध्येयवादी वृत्ती दिसून येईल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं नीट लक्ष असेल. तुमच्या कामाच्या गतीवर देखील परिणाम दिसून येईल. तसेच, जे तरुण आज जॉब इंटर्व्ह्यूसाठी जातील त्यांना सकारात्मक बदल दिसतील.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. विद्यार्थी आपल्या मेहनतीने यश कमावतील. तुमच्या वैवाहिक जीवनात छान स्थिरता दिसून येईल. एकमेकांना सपोर्ट कराल. तसेच, धार्मिक कार्यक्रमात तुमची रुची वाढलेली दिसेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात फार चांगली होईल. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतायत असं तुम्हाला वाटेल. पण कामाच्या बाबतीत योग्य काळजी घ्या. तुमचे विरोधक तुमचा सूड घेण्यास तयार असतील. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. घरात धनसंपत्तीची भरभराट होईल. आज मित्रांबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात फार उत्तम असमार आहे. आज तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळले. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या दिवसाची सुरुवात फार अनुकूल असणार आहे. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतायत. महत्त्वाची कामे करण्यात वेळ दवडू नका. तसेच, घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.

तूळ रास (Libra Horoscope)

आज तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. अनेक क्षेत्रात तुमचा वावर असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास सुखकर असेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या हळुहळू संपतील. त्यामुळे तुम्हाला फार सकारात्मक वाटेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. राजकारणी लोकांपासून दूरच राहा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या कामात थोडीशी दिरंगाई दिसून येईल. तसेच, अचानक थंडी वाढल्यामुळे तुम्हाला थोडा सर्दीचा त्रासही जाणवेल. आज महत्त्वाच्या कामांना आराम द्या. आणि कामाच्या गडबडीतून थोडा वेळ काढून विश्रांती घ्या.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या दिवसाची सुरुवात खास असेल. आज फार दिवसांनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवाल. घरात चांगली सुख शांती नांदेल. तसेच, लक्ष्मीच्या पावलांनी लवकरच घरात पैसा येण्याची शक्यता आहे. आज तुमच्या सिनिअर्सकडून तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती मिळेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आदल्या दिवसापेक्षा जास्त खास असणार आहे. आज तुमच्या जवळच्या नातेवाईकांबरोबर असलेले वाद मिटतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या समस्या आज संपतील. तसेच, शनिदेवाच्या कृपेने लवकरच तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. घरगुती कामात तुमचं मन रमेल. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Swami Samartha : स्वामी समर्थांचा फोटो देवघराच्या आत का ठेवू नये? गुरु आणि देव तत्त्वात काय फरक असतो?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: काय सांगता..शनि साडेसाती सुरू असूनही 'या' लोकांचं नशीब जोरावर! खडतर आयुष्यात मोठा जॅकपॉट? शनिची कृपा कोणावर? ज्योतिषशास्त्र...
काय सांगता..शनि साडेसाती सुरू असूनही 'या' लोकांचं नशीब जोरावर! खडतर आयुष्यात मोठा जॅकपॉट? शनिची कृपा कोणावर? ज्योतिषशास्त्र...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.., साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.., साप्ताहिक राशीभविष्य..
Horoscope Today 20 November 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 4 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 4 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा! 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात, साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा नशीब पालटणारा! 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात, साप्ताहिक राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Mumbai Crime: मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून पोलीस ठाण्यात फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget