एक्स्प्लोर

Horoscope Today 20 December 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? कोणाला मिळणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 December 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 December 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज मुलांच्या प्रगतीने तुम्ही भारावून जाल. तसेच, तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. जर एखाद्या कामाच्या संदर्भाच तुमच्या मनात कोणता संभ्रम असेल ते जवळच्या व्यक्तीशी बोलून तो मोकळा करा.तसेच,कोणतंही काम करताना घाईगडबडीत अजिबात करु नका. अन्यथा तुमच्याकडून चुका होऊ शकतात. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज ऑफिसमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील.त्या तुम्ही चांगल्या आणि प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. फक्त तुम्हाला तुमच्य आरोग्यावर संयम ठेवावा लागेल. धार्मिक कार्यात मन रमेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. जे लोक सरकारी क्षेत्रात काम करतायत त्यांन आपल्या आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. तसेत, कोणतंही काम करताना धैर्य आणि साहस फार गरजेचं आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. 

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा तणावपूर्वक असणार आहे. एखादी गोष्ट तुम्हाला सारखी सतावत राहील. त्यामुळे तुम्ही सतत चिंतेत असाल. तसेच, शारीरिक काम करताना तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चिडचिड करु शकता. तसेच, दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला एखादी वार्ता ऐकायला मिळू शकते. यामुळे तुम्ही फार अस्वस्थ असाल. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही धैर्य आणि साहस ठेवून काम करणं गरजेचं आहे. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम आज पूर्ण होण्याची  शक्यता आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या व्यवसायात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला लवकरच मोठ्या ऑर्डर्स मिळतील.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात देखील गोडवा पाहायला मिळेल. कामाच्या प्रती तुम्ही प्रामाणिक असाल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खुश होऊ शकतो. तसेच, इतरांना मदत करण्यासाठी तुमचा मदतीचा हात कायम पुढे असेल. समाजात मान-सन्मान मिळेल. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. आज तुम्ही एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच, आज तुमची वैयक्तिक गोष्ट कोणालाही सांगू नका. तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी धार्मिक कार्यात मन रमेल. किंवा स्वत:साठी वेळ काढा. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुम्ही कामानिमित्त प्रवास करु शकता. हा प्रवास तुमचा सुखकर होईल. तसेच, तुमचै पेसे देखील आज खर्च होऊ शकतात. त्यामुळे विनाकारण पैसे खर्च करु नका. लवकरच तुमच्या घरात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. जर तुम्हाला एखाद्या व्यवसायात पैसे गुंतवायचे असतील तर नीट विचारपूर्वक पैसे गुंतवा. यातून तुम्हाला लाभ मिळेलच असे नाही. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या आहारावर संतुलन ठेवण्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला पोटाच्या संबंधित आजार होऊ शकतात. मुलांच्या भविष्याच्या बाबतीत तुम्ही थोडे चिंतित असाल. मन शांत ठेवण्यासाठी रोज योग, ध्यान आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. वाचनात मन रमवा. तसेच, नोकरी बदलायची असेल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीचा काळ चांगला आहे. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुम्ही अनेक दिवसांपासून रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. तसेच, जर तुम्हाला एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, आज तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून काहीतरी बोध घेण्याची गरज आहे.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)              

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आध्यात्मिक असणार आहे. आज नवीन गोष्टी शिकण्यात तुम्हाला जास्त रस वाटेल. तसेच, एखाद्या मनोरंजनात्मक किंवा सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. यातून तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्ही कोणत्याच प्रकारची जोखीम घेऊ नका. पैशांच्या बाबतीत तुम्हाला थोडी चिंता वाटेल. त्यामुळे कोणालाही पैसे उधार देऊ नका.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही एखाद्या मंगलमय कार्यात सहभागी होऊ शकता. तसेच, आज तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे इतर दुखावू शकतात. पैशांच्या संदर्भात अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद लवकर संपुष्टात येतील. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 20 December 2024 : आज 'या' 3 राशींना सावधानतेचा इशारा, हाती घेतलेल्या कार्यात येईल अडथळा; 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  20 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :20 डिसेंबर 2024 : ABP MajhaAlmatti Dam Special Report : अलमट्टीच्या धोक्याचा खरा अभ्यास कधी होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Embed widget