Horoscope Today 20 August 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 20 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 20 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज कामावर तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा, तुमचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणं खूप महत्त्वाचं आहे.
व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, अभियांत्रिकी वस्तूंचं काम करणाऱ्यांना नफा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल, दुसरीकडे खाण्यापिण्याच्या पदार्थांसंबंधित काम करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळू शकते, पण त्यांना काम मन लावून करावं लागेल, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप कठीण देखील ठरू शकतो.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात खूप मेहनत करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी कठोर परिश्रम केले तरच त्यांना यश मिळू शकतं. आज आईसोबत वाद घालू नका, अन्यथा तिला त्रास होऊ शकतो.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही व्यायाम केला पाहिजे, व्यायाम न केल्यामुळे तुमच्या शारीरिक समस्या खूप वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंताग्रस्त देखील होऊ शकता.
वृषभ (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं नशीब उज्वल असेल. तुमचा दिवस खूप चांगला जाईल, तुम्ही ऑफिसचं काम वेळेवर पूर्ण कराल, तुमचे अधिकारीही तुमच्या कामावर खुश राहतील आणि ते तुमची बढतीही करू शकतात.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, तुम्हाला चांगला नफा मिळेल.
विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, तरुणांनी कोणत्याही गोष्टीबद्दल निराश होऊ नये. कसलीही चिंता न करता आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जीवनात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल, तुमच्या कुटुंबात कोणताही तणाव असेल तर तुम्ही आनंदाने त्याला सामोरे जा. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुम्ही जर हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत राहा, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते. आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेतल्यास तुम्हाला बरं वाटेल.
मिथुन (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही थोडे सावध राहाल. नोकरदार लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम पत्करू नका, अन्यथा तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारले जावू शकते.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या मालाचा हिशोब नीट ठेवावा आणि अजून किती खर्च होईल किंवा किती खर्च झाला आहे याचा हिशोब ठेवला तर बरं होईल.
विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, तुम्ही आज कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त उत्साही होऊ नये, उलट जास्त असाईनमेंटमुळे तुमची डोकेदुखी वाढेल.
आरोग्य (Health) - आज तुमच्या कुटुंबात तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते, तिला काही प्रकारची त्वचेची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे कोणतेही औषध देताना त्याची एक्सपायरी डेट तपासूनच द्यावी.
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावाल, कारण काम चुकलं तर तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात.
व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकतात. तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही मोठ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना उलटं बोलू नका. आज जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं.
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामासाठी काही ट्रेनिंग घेण्याचा विचार करू शकता, ट्रेनिंगसाठी तुमचा वेळ चांगला असेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही भविष्यातील योजनांवर खूप विचाक करू शकता.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.
कन्या (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज एखादा ग्राहक पैशांबाबत तुमची फसवणूक करू शकतो.
विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला तयार केलं पाहिजे, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका. खूप थंड अन्न खाणं टाळलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखलं पाहिजे.
तूळ (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, परंतु तुम्ही त्यातून सुटू शकता आणि तुमचा विरोधक स्वतः त्या कटात अडकू शकतो.
व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगला होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. आज तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण त्यावर लवकरच उपाय सापडतील.
विद्यार्थी (Student) - तरुण आपल्या कौशल्याने काही मोठं काम करून यश मिळवू शकतात, त्यात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल.
आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेत राहा, अन्यथा जुने आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा आणि शक्य तितका पौष्टिक आहार घ्या.
वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यामुळे काम थांबेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगलं काम कराल, तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.
विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. शाळेला सुट्टी असल्याने मौजमजा करण्यात तुम्ही दिवस घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत होळीच्या तयारीत व्यस्त असाल. तुम्ही तुमचा सण उत्साहात साजरा कराल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.
धनु (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.
मकर (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस कठीण असेल. तुम्हाला विविध संकटातून मार्ग काढत पुढे जावं लागेल. सहकाऱ्यांची मदत तुम्हाला लाभेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, तुम्ही अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे, तरच भविष्य सुरक्षित होईल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा.
कुंभ (Aquarius Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पावसामुळे तुमचं शेड्युल विस्कळीत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी दिवस खूप व्यस्त असणार आहे.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या राशीत शुभ असा सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्यामुळे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक व्यवसायातील लोकांचं जुनं अडकलेलं बिल सुटू शकतं. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ राहील, मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना अधिक फायदा होईल.
तरुण (Youth) - नवीन पिढीला आळशीपणाने गुरफटणाऱ्या ग्रहांनी घेरल्याने त्यांना अत्यावश्यक कामं सोडून इतर सर्व कामं करण्यात रस वाटेल. विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.
मीन (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज पावसामध्ये तुम्ही अडकू शकता, त्यामुळे शक्य असेल तर घरीच बसा, वर्क फ्रॉम होम करा.
व्यवसाय (Business) - व्यवसायात चांगली कमाई केल्याने आर्थिक समस्या दूर होतील. जर तुम्ही नवीन ठिकाणी आउटलेट उघडण्याचा विचार करत असाल तर ते सकाळी 7.00 ते 9.00 आणि सकाळी 5.15 ते 6.15 दरम्यान हे काम करणं चांगलं राहील.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी रात्री ऐवजी ब्रह्म मुहूर्तावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा, सकाळी केलेला अभ्यास बराच काळ लक्षात राहतो.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तब्येतीत सुधारणा तुमच्यात एक आत्मविश्वास आणेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :