Horoscope Today 19 May 2025 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर प्रसन्न होणार बाबा भोलेनाथ; मागाल ती इच्छा होईल पूर्ण, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 19 May 2025 : आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 May 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 19 मे 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
घरामध्ये तुमच्या मताला किंमत येईल परंतु आवश्यक त्या कामाची अंमलबजावणी करण्याचा वेग मात्र मंदावेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
कामातील अडचणी लवकर लक्षात येणार नाहीत घरातील मोठ्या लोकांशी मतभेद होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज काही ठिकाणी संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही लोकांच्या विक्षिप्त आणि लहरी स्वभावामुळे ताण अधिक जाणवेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
बाहेरच्या जगामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे डोके शांत होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कोणतेही यश मिळवण्यासाठी इच्छाशक्ती जबरदस्त ठेवाल आत्मविश्वास वाढेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आलेल्या संधीचं सोनं करणं हे आज तुमच्या हातात आहे म्हणून कामासाठी वेळ काढा.
तूळ रास (Libra Horoscope Today)
महिलांनी सर्व गोष्टींसाठी आपल्या अंतर्मनाचा कौल घ्यावा ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
परिस्थिती बघून भावनांची गल्लत न करता केलेला विचार फायदेशीर ठरेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
वडिलोपार्जित इस्टेटि संबंधी चांगली फळे मिळतील पैसे मिळाले तरी लगेच इन्वेस्ट करावेत.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज सुख मानून घ्यावे लागेल त्यामुळे जेवढी समाधानी वृत्ती ठेवाल तेवढे शांत राहाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
जवळच्या मित्राशी थोडे मतभेद होतील घरातील वातावरणही थोडे नरम-गरम राहील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कुटुंबातील लोकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयास पडतील जुने हेवेदावे डोके वर काढतील.
हेही वाचा :



















