Horoscope Today 17 July 2024 : पंचांगानुसार, आज 17 जुलै 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


वडिलोपार्जित संपत्ती विषयी मोह ठेवणार नाही. कुटुंबामध्ये आपल्या गरजा कमी कशा ठेवाव्यात याचे महत्त्व पटवून द्याल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


आज जरा जास्तच गंभीर बनाल. महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


आज तुमच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. राजकारणामध्ये प्रभाव पाडण्यासाठी उत्तम दिवस आहे.


कर्क (Cancer Horoscope Today)


मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच तीव्र होतील. स्वतःची छाप इतरांवर पटकन पाडाल.


सिंह (Leo Horoscope Today)


आपले विचार लोकांवर लादण्यात यशस्वी ठराल. स्थावर इस्टेटसंबंधीचे प्रश्न सुटतील.


कन्या (Virgo Horoscope Today)


नोकरी व्यवसायात अनेक कामे चिकाटीने पूर्ण कराल. आर्थिक बाजूही सुधारेल.


तूळ (Libra Horoscope Today)


अत्यंत विचार करून व्यवहाराला धरून पैसा खर्च कराल. मोजके बोलून शांत राहून आपली कामे साध्य कराल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


कोळसा लोखंडी सामानाचा व्यापार करणाऱ्यांना पैसा मिळेल. वैवाहिक जीवनात गैरसमज होण्याची शक्यता आहे.


धनु (Sagittarius Horoscope Today)


लोकांशी सुसंवाद साधण्याचा उपयोग नोकरी-व्यवसायात उत्तम होणार आहे. परदेशगमनाच्या संधी मिळतील. 


मकर (Capricorn Horoscope Today)


ज्यांचा परदेशी कंपन्याशी व्यवहार चालतो, अशा व्यक्तींना नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. भावंडांशी मतभेद होतील. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आज परिस्थिती आहे तशी स्वीकारणे भाग पडेल. अति भावनाप्रधानता टाळणे इष्ट ठरेल.


मीन (Pisces Horoscope Today)


मनातील गुप्त भावना इतरांसमोर व्यक्त करू नयेत. काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती मात्र थोडी कमी पडेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Ashadhi Ekadashi Wishes : आषाढी एकादशीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश