Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) देवशयनी एकादशी देखील म्हणतात. देवशयनी एकादशीपासून देव झोपी जातात. आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवसापासून 4 महिन्यांपर्यंत देव निद्रावस्थेत जातात. या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात आणि या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. यावर्षी देवशयनी एकादशी 17 जुलै 2024 रोजी, म्हणजेच बुधवारी येत आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो.


यंदा देवशयनी एकादशीला शुभ योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि शुक्ल योग तयार होत आहे. या योगांची निर्मिती खूप शुभ मानली जाते. या योगांचा चार राशींवर शुभ परिणाम दिसून येईल, या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आषाढी एकदशीच्या दिवशी निर्माण होणाऱ्या योगांचा मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. तर काहींना आर्थिक लाभ होईल. काही लोकांचा खर्च या काळात वाढेल, पण ते धैर्याने या परिस्थितीला सामोरं जातील. सकारात्मक विचार ठेवल्याने या राशीच्या लोकांना फायदा होईल.


वृषभ रास (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी देवशयनी एकादशी चांगला लाभ देणारी ठरेल. एकादशीपासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. सर्व जुन्या समस्या दूर होतील. त्यांच्या इतरांसोबत असलेले संबंध सुधारतील. नवीन संपर्क निर्माण होतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुम्हाला इच्छित पद आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे.


सिंह रास (Leo)


आषाढी एकादशी सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. राजकारणात सक्रिय लोकांसाठी काळ चांगला आहे. या काळात लोकांवर तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याचे नवीन पर्याय तुमच्या समोर येतील. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल.


कन्या रास (Virgo)


देवशयनी एकादशी कन्या राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या राशीच्या लोकांची प्रगती होईल. अनेकांना प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याच्या सुवर्ण संधी मिळतील. तुम्हाला गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन नोकरी किंवा बढतीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Devshayani Ekadashi 2024 : देवशयनी एकादशी 16 की 17 जुलैला? देव निद्रावस्थेत जाण्याआधी करुन घ्या 'ही' शुभ कार्य