Horoscope Today 16 May 2024 : पंचांगानुसार, आज 16 मे 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याला स्मरून प्रथम अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांना घरात इतरांबरोबर तडजोड करावी लागेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


कोणत्याही मोहपाशात न अडकता ईश्वराला स्मरून काम करा. व्यवसायात इतरांशी स्पर्धा करण्यामध्ये सरशी राहील.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


पुढे मिळणाऱ्या पैशाची बीजे आज रोवली जातील. कुटुंबात मंगल कार्यात हजेरी लावावी लागेल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


विद्यार्थ्यांना पूर्वीच्या अभ्यास पद्धतीत बदल करावासा वाटेल. गर्भवती स्त्रियांनी योग्य ती काळजी घ्यावी. 


सिंह रास  (Leo Horoscope Today)


नवीन बदलला सामोरे जाल थोडा वेळ अवश्य जाईल परंतु प्रयत्न सोडू नका. वाहने जपून चालवावी.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नवीन नोकरी ज्यांना शोधायची आहे त्यांनी अवश्य विचार करावा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पथ्य पाणी सांभाळावे.


तुळ रास  (Libra Horoscope Today)


वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधीचे प्रश्न लांबणीवर टाकने चांगले. कोणतेही आर्थिक नियोजन आज करू नये.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या व तुमच्या विचारात तफावत राहील. अति भावनाप्रधानतेमुळे नुकसान होऊ शकते. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


संधीचे सोने करण्यासाठी समय सुचकता ठेवायला लागेल. प्रेमवीरांना मनासारखा जोडीदार मिळण्याची संधी दिसेल.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी थोडे थांबावे लागेल. पैशाच्या बाबतीत अंदाज चुकण्याची शक्यता आहे.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


अगदी लहान गोष्टीतला आनंद सुद्धा भरभरून घेता येणार नाही. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल.


मीन रास  (Pisces Horoscope Today)


इष्टदेवतेचे नामस्मरण बरीच मनशांती देईल. अचानक घडणारे योगायोग सुखदुःखाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हेही वाचा:


Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल