Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. ते शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत चाणक्याने (Chanakya Niti) महत्त्वाची भूमिका बजावली. आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून "अर्थशास्त्र", "कुटनीती", "चाणक्य नीती" ही रचना केली होती. तर, व्यवसायात यश मिळवण्यासाठी कोणते 3 नियम गरजेचं आहेत ते जाणून घेऊयात.
चाणक्य नीतीत काय म्हटलंय?
1. चाणक्य नीतीनुसार, यशस्वी जीवनासाठी 3 नियम सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये स्वतःशी वचन, मेहनत आणि दृढ निश्चय यांचा समावेश आहे. कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही ध्येय साध्य करता येत नाही. यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. आणि दृढ निश्चय आणि संघर्षामुळेच जीवनातील आव्हाने कमी होऊ शकतात असे चाणक्य सांगतात.
2. चाणक्य नीतीनुसार स्त्री सर्वकाही पुरुषाच्या हाती सोपवते. पुरुषाच्या स्पर्शाने आणि भावनेने ती तृप्त होते. त्यामुळे अशा महिलेची कधीही फसवणूक करू नये. कारण अशा परिस्थितीत स्त्री आतून तुटते, मनाने खचते. आणि ती त्यामधून कधीच बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच ज्या पतीला आपल्या स्त्रीबद्दल आदर आणि सन्मान आहे त्याने तिची फसवणूक करू नये.
3. चाणक्य नीतीमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, मूर्ख व्यक्तीसाठी पुस्तके जितकी उपयुक्त आहेत तितकीच आरसा अंध भक्तासाठी उपयुक्त आहे. कारण आरसा जे सत्यापासून पाठ फिरवतात त्यांना सत्याचा चेहरा दाखवतो. अशी व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही. ज्ञानाचा अभाव असलेल्या व्यक्तीला सत्य ओळखण्याची क्षमता नसते आणि तो सत्यापासून आपले जीवन दूर ठेवतो.
4. आचार्य चाणक्य यांच्या मते, आई आणि वडील हे जगातील दोनच खरे ज्योतिषी आहेत, जे तुमचे मन आणि तुमचे भविष्य नियंत्रित करतात. जी आई असते ती तुमचं मन चांगलं समजते. तर, वडील तुमचे भविष्य घडविण्यासाठी कठोर परिश्रम करतात. पालक केवळ आपल्या मुलांना मार्गदर्शन करत नाहीत तर त्यांचे भविष्य घडवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :