IPL 2024 RR vs PBKS LIVE Score: पंजाब किंग्सच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. राजस्थानला 20 षटकात 8 विकेटच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थानकडून रियान पराग यानं एकाकी झुंज दिली. त्याने 48 धावांची खेळी केली. पंजाबकडून हर्षल पटेल, राहुल चहर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. पंजाबला विजयासाठी 145 धावांची गरज आहे.
राजस्थानची सुरुवात खराब -
गुवाहाटीच्या मैदानावर संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय अंगलट आला. राजस्थानच्या फलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट फेकल्या. रियान पराग आणि आर. अश्विन यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पराग वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंक्याही पार करता आली नाही. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. त्याला फिल्डर्सकडून चांगली साथ मिळाली.
संजू मोठी खेळी करण्यात फेल -
पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानची सुरुवातच अतिशय खराब झाली. फॉर्मात असलेला यश्सवी जायस्वाल फक्त चार धावा काढून तंबूत परतला. त्याला पहिल्याच षटकात सॅम करन यानं यशस्वी जायस्वाल याला बाद केले. यशस्वी जायस्वाल फक्त चार चेंडूत चार धावा काढू शकला. त्यानंतर मात्र राजस्थानची फलंदाजी अतिशय संथ झाली. राजस्थानच्या फलंदाजांना धावा काढतानाही संघर्ष करावा लागला. संजू सॅमसन आणि टोम कोल्हार केडमोर यांनी पॉवरप्लेमध्ये संध फलंदाजी केली. कोडमोर 23 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. तर संजू सॅमसन याला 15 चेंडूत 18 धावा काढता आल्या. कोडमोर यानं दोन चौकार आणि एक षटकार ठोकला, तर संजू सॅमसन याने तीन चौकार ठोकले.
रियान परागने डाव सावरला -
42 धावांवर राजस्थानला तीन धक्के बसले, त्यानंतर रियान पराग याने अश्विनच्या साथीने राजस्थानच्या डावाला आकार दिला. रियान पराग आणि अश्विन यांनी 34 चेंडूमध्ये 50 धावांची भागिदारी केली. राजस्थानकडून ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.रियान पराग यानं एकाकी झुंज दिली. त्यानं शानदार खेळी केली. रिायन पराग यानं 34 चेंडूत 48 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार ठोकले.
अश्विनने रियान पराग याला चांगली साथ दिली. अश्विनने 19 चेंडूमध्ये एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी केली. अश्विन बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल यानेही लगेच विकेट फेकली. जुरेल याला खातेही उघडता आले नाही. रोवमन पॉवेल याला राहुल चाहर यानं चार धावांवर तंबूत धाडले. त्याने पाच चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 4 धावा केल्या. डेवोन फरेरा याला इम्पॅक्ट पाडता आला नाही. तो आठ चेंडूत सात धावा काढून तंबूत परतला. बोल्ट यानं अखेरच्या षटकात रियानला साथ दिली.
पंजाबचा भेदक मारा -
सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चाहर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी राजस्थानच्या प्रत्येकी दोन दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. अर्शदीप सिंह, नॅथन इलिस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.