एक्स्प्लोर

Horoscope Today 16 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 January 2025 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 January 2025 : आज 16 जानेवारीचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. तसेच, आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावाचा असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्यवसायात एखादी मोठी डील तुमच्या हातून सुटू शकते. त्यामुळे तुम्ही तणावात असाल. तसेच, आज जर तुम्ही कुठे पैसे गुंतविण्याचा विचार करणार असाल. तर त्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. पालकांच्या मदतीने तुम्ही महत्त्वाची कामे पार पाडाल.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अपेक्षेप्रमाणे जास्त चांगला नफा मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या जुन्या चुकांमधून तुम्ही चांगला बोध घ्याल. आज तुम्ही मित्र-मैत्रीणींबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. तुमच्या आरोग्यात काहीसा चढ-उतार जाणवत राहील. तसेच, लवकरच कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. तसेच, परस्परातील मतभेद दूर होतील.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, लवकरच तुमच्या घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. आज तुम्ही कोणताही निर्णय घेताना सर्वात आधी कुटुंबियांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. शरीराचे आजार आणि त्वचारोगामुळे तुम्ही मानसिक तणावात असाल.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजजा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमची तुमच्या कामाप्रती एकाग्रता वाढलेली दिसेल. तसेच, पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता जाणवत असेल तर ती गोष्ट सोडविण्याचा प्रयत्न करा. आज कोणाबरोबरही अनावश्यक वाद टाळा.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला खूप पश्चाताप होईल. तसेच, तुमच्या व्यवसायात कोणतीही डील फायनल करताना एकदा शहानिशा करणं गरजेचं आहे.नोकरीत तुमची कामगिरी चांगली राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्हाला एखाद्या कामासाठी कोणाकडून आर्थिक मदत हवी असल्यास ती तुम्हाला अगदी सहज मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आज तुम्ही कोणालाही मदत करायला जाऊ नका. तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. वातावरणातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यात चढ-उतार जाणवेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय असाल. आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही नियमित योगा करणं गरजेचं आहे. पुरेशी झोप घ्या.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमचा कल आध्यात्माकडे जास्त असणार आहे. तसेच, आजच्या दिवसात तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. भविष्यासाठी जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी ही वेळ तुमच्यासाठी चांगली असणार आहे. व्यवसायात आज एक डील फायनल होईल.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात आलेल्या अपयशामुळे काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जास्त कामाचा ताण वाढू शकतो. अशा वेळी स्वत:चा मूड फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या करिअर आणि बिझनेसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)              

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संकटांचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. तुमच्या जुन्या चुकांमधून तुम्हाला बोध घ्यावा लागेल. तसेच, सकारात्मक विचार जतन करावे लागतील. तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचं मत विचारात घेऊन निर्णय घ्या. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 16 January 2025 : आजच्या दिवशी 3 राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget