एक्स्प्लोर

Horoscope Today 16 April 2026 : आज गुरुवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी; दिवसाच्या सुरुवातीलाच संकटाची लागणार चाहूल; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 April 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 16 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 16 एप्रिल 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. त्यानुसार, आज दत्तगुरुंची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चिंतेचा असेल. प्रवास करताना तुम्हाला काही अडचणी उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळेल. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या व्यवसायात थोडा चढ-उतार पाहायला मिळेल. कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील जुने वाद तुमचे लवकरच मिटतील. मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. तसेच, लाल वस्तू दान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल. तुमच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मात्र, त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आज काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं. तुमच्या भूतकाळातील आठवणी आज ताज्या होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. काही विशेष घडणार नाही.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यामध्ये जराही दिरंगाई करु नका. प्रेम जीवन देखील सामान्य राहील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मेहनतीचं फळ मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र, भविष्याविषयी तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला नाक, कान घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही. हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Shani Nakshatra Parivartan 2026 : अक्षय्य तृतीयेच्या आधी शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशी ठरतील लकी, सुवर्णकाळ लवकरच सुरू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: थलपती विजय यांच्या 'या' जन्मतारखेत यशाचं सीक्रेट? राहूची मोठी भूमिका? रातोरात पालटलं नशीब, अंकशास्त्रात म्हटलंय...
थलपती विजय यांच्या 'या' जन्मतारखेत यशाचं सीक्रेट? राहूची मोठी भूमिका? रातोरात पालटलं नशीब, अंकशास्त्रात म्हटलंय...
Numerology: वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांकडे येतो भरपूर पैसा, बंगला, जोडीदार! शनिदेवांचं भक्कम पाठबळ, 'असं' नशीब फळफळतं की थेट कोट्यधीश, अंकशास्त्र
Numerology: वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांकडे येतो भरपूर पैसा, बंगला, जोडीदार! शनिदेवांचं भक्कम पाठबळ, 'असं' नशीब फळफळतं की थेट कोट्यधीश, अंकशास्त्र
Grahan Yog 2026: अरे देवा..आज 12 मे पासून 2 राशी अडचणीत सापडल्या! राहू-चंद्राचा अशुभ ग्रहण योग, 'ही' एक चूक, सांभाळून राहा, ज्योतिषींचा इशारा...
अरे देवा..आज 12 मे पासून 2 राशी अडचणीत सापडल्या! राहू-चंद्राचा अशुभ ग्रहण योग, 'ही' एक चूक, सांभाळून राहा, ज्योतिषींचा इशारा...
Shani Jayanti 2026: अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त..पुढच्या 4 दिवसांत 5 राशींची बसल्या बसल्या श्रीमंतीकडे वाटचाल! शनि जयंतीला पॉवरफुल ग्रहयोग, कष्टाचा अंत..
अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त..पुढच्या 4 दिवसांत 5 राशींची बसल्या बसल्या श्रीमंतीकडे वाटचाल! शनि जयंतीला पॉवरफुल ग्रहयोग, कष्टाचा अंत..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Embed widget