Horoscope Today 12 December 2025 : आज देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात येणार पैसा, संध्याकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट टाळा; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात 12 राशींचं आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 12 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 12 डिसेंबर 2025 चा आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस फार कास आहे. कारण हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. भक्त मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतात. तसेच, इच्छित फळ मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही फार सक्रिय असाल. कोणताही व्यवहार करताना विचारपूर्वक करा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस उत्साही असणार आहे. आज अनेक सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, मित्रांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. बाहेर फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. एखादी चांगली डील तुमच्या हाती लागू शकते. आज देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, नवीन घर किंवा प्रॉपर्टी घेण्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या हाती चांगली डील लागू शकते. फक्त तुम्हाला त्या संधीचा वेळीच फायदा घेता यायला हवा. पैशांची गुंतवणूक तुम्ही करु शकता. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढले. तसेच, तुम्ही घेतलेले निर्णय विचारपूर्वक पद्धतीने उतरवा.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतील. तसेच, भविष्यासाठी तुम्ही काही योजना राबवणार असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. तुमच्या कामाला वेळीच प्रायोरिटी द्या.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी दिवसाची सुरुवात फरा चांगली असणार आहे. आज धनसंपत्तीत भरभराट होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्ही आज पूर्ण करु शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला काहीसं बैचेन वाटेल. भूतकाळातील गोष्टी आठवून तुमचं मन कासावीस होईल. तसेच, ऑफिसच्या कामामध्ये तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टी रखडतील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्या व्यवहारात अधिक वेग येईल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत असल्यामुळे तुम्ही फार उत्साही असाल. तुम्ही कोणाच्याच अध्यात मध्यात पडू नका. तुमच्या कामाशी काम ठेवा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी दिवसाची सुरुवात फार चांगली आहे. पण जसजसा दिवस पुढे जाईल नकारात्मक विचार तुमच्या मनात घोळतील. त्यांना थारा देऊ नका. मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योग करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या कामात सातत्य ठेवा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी फार उत्साही दिवस असणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. पण हा प्रवास फार सुखकर असेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. नवीन संधी निर्माण होतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. ज्या गोष्टीची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहात होतात. ती गोष्टी अखेर तुमच्यासमोर घडेल. आज घरगुती कामांमध्ये तुमची आवड निर्माण होईल. तसेच, पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















