Horoscope Today 12 December 2024 : आजचा गुरुवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 December 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 12 December 2024 : पंचांगानुसार, आज 12 डिसेंबर 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
बौद्धिक बाबतीत आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज तुमच्यासमोर गुप्त शत्रूंचे काही चालणार नाही. आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
एखाद्या आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे.
कर्क (Cancer Horoscope Today)
घरामध्ये झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीमध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण करायला लागेल.
सिंह (Leo Horoscope Today)
ज्या स्त्रियांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी व्यायाम आणि औषधोपचारावर भर द्यावा.
कन्या (Virgo Horoscope Today)
देश तसा वेश घेण्यात पटाईत राहणार आहात. ज्यांना लेखनाची कला अवगत आहे त्यांनी अवश्य लिखाण करावे.
तूळ (Libra Horoscope Today)
प्रसिद्धीच्या झोतात याल. नोकरी-व्यवसायात भाग्याची साथ मिळेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
ज्यांना नोकरीत बदल करण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य प्रयत्न करावा. महिला करिअरकडे जास्त लक्ष देतील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
वडिलोपार्जित इस्टेटीच्या कामकाजासाठी एखादी अचानक घटना घडण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn Horoscope Today)
आज कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी संशोधन क्षेत्रात काम करतात त्यांना नवीन कल्पना सुचतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांच्या अवखळपणाला मोठ्यांनी बांध घातला तर तो त्यांना रुचणार नाही.
मीन (Pisces Horoscope Today)
कामामध्ये शिस्त आणि अभ्यासू वृत्ती ठेवणार आहात. महिलांना बरेच कष्ट पडतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: