एक्स्प्लोर

Horoscope Today 09 July 2024 : आज विनायक चतुर्थी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 09 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 09 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज कामावर तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा, तुमचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणं खूप महत्त्वाचं आहे. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, अभियांत्रिकी वस्तूंचं काम करणाऱ्यांना नफा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल, दुसरीकडे खाण्यापिण्याच्या पदार्थांसंबंधित काम करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळू शकते, पण त्यांना काम मन लावून करावं लागेल, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप कठीण देखील ठरू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात खूप मेहनत करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी कठोर परिश्रम केले तरच त्यांना यश मिळू शकतं. आज आईसोबत वाद घालू नका, अन्यथा तिला त्रास होऊ शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही व्यायाम केला पाहिजे, व्यायाम न केल्यामुळे तुमच्या शारीरिक समस्या खूप वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंताग्रस्त देखील होऊ शकता.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं नशीब उज्वल असेल. तुमचा दिवस खूप चांगला जाईल, तुम्ही ऑफिसचं काम वेळेवर पूर्ण कराल, तुमचे अधिकारीही तुमच्या कामावर खुश राहतील आणि ते तुमची बढतीही करू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, तुम्हाला चांगला नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, तरुणांनी कोणत्याही गोष्टीबद्दल निराश होऊ नये. कसलीही चिंता न करता आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जीवनात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल, तुमच्या कुटुंबात कोणताही तणाव असेल तर तुम्ही आनंदाने त्याला सामोरे जा. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुम्ही जर हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत राहा, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते. आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेतल्यास तुम्हाला बरं वाटेल.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही थोडे सावध राहाल. नोकरदार लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम पत्करू नका, अन्यथा तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारले जावू शकते.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या मालाचा हिशोब नीट ठेवावा आणि अजून किती खर्च होईल किंवा किती खर्च झाला आहे याचा हिशोब ठेवला तर बरं होईल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, तुम्ही आज कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त उत्साही होऊ नये, उलट जास्त असाईनमेंटमुळे तुमची डोकेदुखी वाढेल.

आरोग्य (Health) - आज तुमच्या कुटुंबात तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते, तिला काही प्रकारची त्वचेची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे कोणतेही औषध देताना त्याची एक्सपायरी डेट तपासूनच द्यावी.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या आज संपुष्टात येतील, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांति मिळेल.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, ग्रहांची स्थिती लक्षात घेता तुम्हाला व्यवसायाशी संबंधित अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धिच्या जोरावर सर्व आव्हानांवर मात करू शकता.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मन एकाग्र केलं पाहिजे आणि इतर गोष्टींमध्ये विचलित होऊ नये. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल खूप सावध असलं पाहिजे. एक छोटीसा निष्काळजीपणा सुद्धा तुमची तब्येत पूर्वीपेक्षा जास्त बिघडवू शकतो, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःवर उपचार करुन घ्या.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, जर आज तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर बाप्पाच्या आशीर्वादाने बाहेर पडल्यास चांगलं होईल, तुमची मुलाखत चांगली जाईल आणि तुम्हाला मनासारखी नोकरी मिळू शकेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, सर्व कामांची जबाबदारी जर व्यावसायिकांवर असेल तर त्यांनी ते काम त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कमी प्रमाणात वाटून घ्यावं, जेणेकरून तुमचं काम लवकर पूर्ण होईल आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल.

विद्यार्थी (Student) - तु्म्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, त्यानंतरच यश मिळवू शकता. चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःचं रक्षण करा. आज तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा अनावश्यक खर्चामुळे तुम्ही एखाद्या अडचणीत अडकू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही जड अन्न खाणं टाळावं, जास्त तळलेले अन्न आणि जड अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले पाहिजे, तरच शरीर निरोगी होऊ शकतं.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज कामाच्या ठिकाणी अत्यंत संयमी वर्तन ठेवावं लागेल आणि सर्व काम नीट सौम्यतेने करावं लागेल. तुमचे सहकारी आज तुमच्यावर रागवू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर नफ्यापूर्वी व्यवसाय आणि बाजारपेठेत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तरच व्यवसाय प्रगती करू शकाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवावं, अन्यथा तुम्हीही चुकीच्या संगतीत अडकू शकता. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला धूळ आणि मातीची ऍलर्जी असेल तर तुमची ऍलर्जी खूप वाढू शकते. आज तुमची तब्येत असामान्य होऊ शकते. धुळीच्या ऍलर्जीमुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, परंतु तुम्ही त्यातून सुटू शकता आणि तुमचा विरोधक स्वतः त्या कटात अडकू शकतो.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगला होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. आज तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण त्यावर लवकरच उपाय सापडतील.

विद्यार्थी (Student) - तरुण आपल्या कौशल्याने काही मोठं काम करून यश मिळवू शकतात, त्यात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल.

आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेत राहा, अन्यथा जुने आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा आणि शक्य तितका पौष्टिक आहार घ्या.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यामुळे काम थांबेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगलं काम कराल, तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. शाळेला सुट्टी असल्याने मौजमजा करण्यात तुम्ही दिवस घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत होळीच्या तयारीत व्यस्त असाल. तुम्ही तुमचा सण उत्साहात साजरा कराल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, तुमची नियोजित कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीने काम कराल, तुमचे बॉस तुमच्यावर खूश असतील आणि ते तुमचा पगारही वाढवू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.  

कौटुंबिक (Family) - तुमच्या मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. तुमच्या जीवनात यश मिळवण्यासाठी अनावश्यक भांडणांपासून दूर राहा, तुमचं तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून भांडण होऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला कामावर काही नवीन संधी मिळतील ऑफिसमध्ये तुम्ही नाव कमवाल. लक्ष देऊन काम करत राहा.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा खूप विस्तार करू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कुणालाही चुकीचं बोलू नका. आज तुम्ही तुमच्या मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यात यशस्वी व्हाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांना त्यांचं खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याची मदत घ्यावी लागेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. तुम्हाला डॉक्टरकडेही जावं लागू शकतं.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या ऑफिसचं वातावरण आज तुम्हाला आज खूप अडचणीत टाकू शकतं, परंतु तुमच्या हुशारीने तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकाल. आज तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेचा वापर कराल. बोलताना थोडी सावधगिरी बाळगा आणि पैशाच्या व्यवहारातही थोडं सावध राहा, अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नशिबामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. व्यवसायात तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती नीट हाताळाल.

विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हाड किंवा अंग दुखण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खा, तुमचं आरोग्य सुधारेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 09 July 2024 : आज विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी खास; लाभणार बाप्पाची विशेष कृपा, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला, पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला; पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
Virgo Yearly Horoscope 2025 : कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 खास; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 खास; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare On Medha Kulkarni : 'मेधाताई बालिशपणा थांबवा जरा!'सुषमा अंधारे संतापल्या...Vijay Wadettiwar PC : 'Dhananjay Munde दहा बायका करा पण कुणाचा खून करु नका!'Boisar Tarapur MIDC Fire : आगीचे लांबच लांब लोळ, धुराचे लोट; कारखान्याच्या आगीची Drone दृश्यNana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला, पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला; पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
Virgo Yearly Horoscope 2025 : कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 खास; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 खास; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
Libra Yearly Horoscope 2025 : तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2025 भाग्याचे; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2025 भाग्याचे; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
Mutual Fund : 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील  गुंतवणुकीवर नफ्याऐवजी तोटा, यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांचं नियोजन फसलं, 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील गुंतवणूक तोट्यात
Embed widget