Horoscope Today 09 January 2025: पंचांगानुसार, आज 09 जानेवारी 2025, गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? श्रीविठ्ठलाची कृपा कोणावर असणार? कोणाचं नशीब बदलणार? कोणाला समस्यांचा सामना करावा लागेल? या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज समोरच्या व्यक्तीला गोंधळून टाकण्यास, तुम्ही कारणीभूत ठरणार आहात, त्यामुळे गैरसमज होतील, विचारपूर्वक बोला.
वृषभ (Taurus Horoscope Today)
ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे, त्यांना फायदा होईल, अनेक अडचणी दूर होतील
मिथुन (Gemini Horoscope Today)
जोडीदारासाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
घरामध्ये अचानक एखादी दुरुस्ती निघून पैशाचा अपव्यय होईल.
सिंह (Leo Horoscope Today)
पैशाची आवक चांगली राहील, व्यवसायात काम मनाप्रमाणे राहिल्यामुळे इच्छा पूर्ण होतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
घरामध्ये महिलांचा मौज मजा करण्याचा असेल. जुने मित्र भेटतील
तूळ (Libra Horoscope Today)
धाडसाने एखादे काम पूर्ण कराल. शत्रूंवर कुरघोडी केली जाईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
राजकारणामध्ये यश मिळेल, तुमच्या कामातील तडफदारी वाखाणण्यासारखी राहील
धनु (Sagittarius Horoscope Today)
प्रकृतीची साथ चांगली मिळेल, मानमरातब घर चालत येतील
मकर (Capricorn Horoscope Today)
अधिकाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील
कुंभ (Aquarius Horoscope Today)
कामाचा उरक चांगला राहील, उत्तम आत्मविश्वास राहिल्यामुळे यश मिळेल.
मीन (Pisces Horoscope Today)
मुक्त आणि स्वच्छंदी जगाल, महिला वर्ग नसती कामे उकरून काढतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>>
Shani Dev: शनिदेव 'या' राशींवर छडी उगारणार! 365 दिवस वाढणार अडचणी? कसं मुक्त व्हाल? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )