(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 05 September 2024 : मेष राशीचे लोक होतील मालामाल; वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस संकटाचा; वाचा राशीभविष्य
Horoscope Today 05 September 2024 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 05 September 2024 : पंचांगानुसार, आज 05 सप्टेंबर 2024, आजचा दिवस शनिवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - तुमच्या कामामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये आज चांगला मान मिळेल. बॉसकडून कौतुक होईल. अधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल.
व्यवसाय (Business) - जर तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते आज परत करा.
कुटुंब (Family) - आपल्या आई-वडिलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सहलीला किंवा धार्मिक स्थळी फिरायला घेऊन जा.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला अस्थम्याचा त्रास जाणवू शकतो. धुळीच्या संपर्कात येऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला महिला कर्मचाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळणार आहे.
व्यवसाय (Business) - जे मेडिकल क्षेत्रात आहेत त्यांनी आपल्या व्यवहारातील स्टॉकवर नीट लक्ष द्या. मान संपत आल्यास तो वेळीच भरायला सुरुवात करा.
युवक (Youth) - भूतकाळासंबंधित जुन्या आठवणी आज तुम्हाला त्रास हे
आरोग्य (Health) - आज तुम्ही केसांशी संबंधित समस्येने जास्त त्रस्त असाल. यासाठी आहारात पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करा.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - तुमच्या कामात अधिक चांगली कशी प्रगती करता येईल. या संदर्भात तुम्ही विचार कराल.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्ग आपल्या कामाच्या बाबतीत फार सतर्क आणि उत्सुक असतील.
युवक (Youth) - जे अंतर्मुख स्वभावाचे आहेत त्यांना आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आरोग्य (Health) - तुम्हाला एखादी जखम होऊ शकते. किंवा काही लागू शकतं. यासाठी चालताना काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :