एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 04 July 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 04 July 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 04 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. आपल्या कामात सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने भागीदारीत व्यवसाय करताना नीट खात्री करून घ्या. डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. 

युवक (Youth) - तरूण वर्गाला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच तुम्हाला यश प्राप्त होईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्ही डोळ्यांच्या त्रासाने हैराण होऊ शकता. यासाठी हलगर्जीपणा करू नका, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पॉलिटिक्सपासून दूर राहा. अन्यथा तुम्ही यात अडकू शकता. 

व्यवसाय (Busines) - आज व्यापारी वर्गाला अनपेक्षित लाभ भेटू शकता. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. 

युवक (Youth) - तरूण वर्गाने आज कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. 

आरोग्य (Health) - आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बीपीच्या त्रासाने त्रस्त असू शकता. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. कामाच्या अधिक ताणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - जर तुम्हाला नव्याने तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ चांगली आहे. 

युवक (Youth) - आज भावा-बहिणींबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. घरातून विनाकारण बाहेर पडू नका. 

आरोग्य (Health) - ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातून विनाकारण बाहेर पडू नका. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला पैशांची गरज भासू शकते. लोनच्या संदर्भात तुम्ही ऑफिसमध्ये तसेच बॅंकेत विचारणा करू शकता. 

व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित एखादी योजना आखली असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. 

तरूण (Youth) - नात्यात मुलगा असो वा मुलगी. दोघांना एकमेकांची गरज भासतेच. त्यामुळे नात्यात विश्वास ठेवायला शिका. 

आरोग्य (Health) - आज पायांची खूप काळजी घ्या. पायांवर कोणत्याही प्रकारचा जोर देऊ नका.

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुमचा ऑफिसमधील दिवस सामान्य असेल. तुमच्यावर आज कोणतंच कामाचं प्रेशर नसणार. 

व्यापार (Business) - व्यावसायिकांना बऱ्याच दिवसांनंतर नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही मन लावून काम कराल. 

तरूण (Youth) - तुम्हाला खूप मेहनत घेण्याची गरज आहे. तरच तुमची स्वप्नं साकार होऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमचा दिर्घकालीन त्रास आज पुन्हा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. पण, चिंता करू नका. हा ही त्रास कमी होईल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला छोट्यातलं छोटं काम करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागेल. त्यामुळे इतरांची नजर तुमच्यावर असेल. 

व्यापार (Business) - आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित तुमचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना फायदा ना तोटा होईल. त्यामुळे तुम्ही संतुष्ट असाल. 

तरूण (Youth) - आज तुमच्या मनात अनेक विचार सुरु असतील. त्यामुळे अतिविचार करू नका. 

आरोग्य (Health) - तुमच्या खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा करू नका. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - जे लोक कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार आहेत त्यांनी बॉसचे मार्गदर्शन घ्यावं. काम करणाऱ्या व्यक्तीने डेटा सुरक्षिततेवर देखील लक्ष दिलं पाहिजे, कारण डेटा चोरी होण्याची शक्यता असते.

व्यवसाय (Business) - वैद्यकीय, फार्मसी आणि सर्जिकल व्यवसायाशी संबंधित लोकांना वस्तूंचा पुरवठा करणं किंवा पैसे घेणं यासारख्या कामांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - नवीन पिढीला आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करून तुमच्या अपेक्षा पूर्ण कराल.

आरोग्य (Health) - मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल. कंपनीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी कामसू व्यक्तीची निवड केली जाऊ शकते, अशा परिस्थितीत तुमचं काम चांगलं ठेवा.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते मिटलेले दिसते, तुम्ही व्यवसाय हाताळण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नवीन पिढी करिअरची काळजी करेल. आवडीचे काम करण्यासाठी वेळ मिळेल. खूप दिवसांनी तुम्हाला जुने मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

आरोग्य (Health) - किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. निष्काळजीपणामुळे हा आजार मोठा व्हायला वेळ लागणार नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नवीन करिअर सुरू करणाऱ्या लोकांनी कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करावं आणि इतरांकडून मिळालेल्या धड्यांचं पालन करावं.

व्यवसाय (Business) - ध्रुव योग तयार झाल्याने धातू आणि औद्योगिक व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी हिशेबाच्या बाबतीत थोडे गोंधळलेले दिसू शकतात.

विद्यार्थी (Student) - नवीन पिढीने जाणकार लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या सल्लागारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती रागावली असेल तर त्याला शांत करण्यासाठी दिवस चांगला आहे.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. तुम्हाला सध्याच्या आजारांपासून लवकरच आराम मिळेल.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल. जर एखादी नोकरी करणारी व्यक्ती नुकतीच नवीन नोकरीवर रुजू झाली असेल तर त्याने आपल्या वरिष्ठांशी गैरसंवाद टाळावा.

व्यवसाय (Business) - ब्युटी प्रोडक्ट्सच्या संदर्भात व्यवसाय करणाऱ्यांचा ग्राहकांशी वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.

कौटुंबिक (Family) - विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत बेफिकीर राहणं टाळावं, अन्यथा निकाल खराब येऊ शकतात. दिवसाच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंना आळसाने घेरलेलं असेल, त्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकणार नाही. 

आरोग्य (Health) - ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना काही प्रकल्पासंदर्भात टीमसोबत महत्त्वाच्या बैठका घ्याव्या लागतील, कमी वेळ आणि काम जास्त अशा परिस्थिती उद्भवू शकतात. 

व्यवसाय (Business) - ध्रुव योगाच्या निर्मितीमुळे घाऊक विक्रेत्यांना मोठ्या मालाची ऑर्डर मिळून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. जे ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी या दिशेने वेगाने वाटचाल करावी. तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवले ​​पाहिजेत.

विद्यार्थी (Student) - स्पर्धक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मजबूत होईल, आत्मविश्वासाच्या जोरावर ते सर्वात मोठा विषयही सहज समजून घेऊ शकतील.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलकं वाटेल.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्हाला कामाच्या ठिकाणी बॉसशी समन्वय राखावा लागेल आणि महिला कर्मचाऱ्यांचाही आदर करावा लागेल. मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक लोकांसोबत बैठका घ्याव्या लागतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना एक विशेष सल्ला दिला जातो की, जेव्हा त्यांना त्याच्या कामात कोणतीही अडचण येते तेव्हा त्याने त्या समस्यांवर हुशारीने उपाय शोधलं पाहिजे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये. कोणत्याही प्रकारचा कर थकबाकी असेल तर तो वेळेवर भरा.

विद्यार्थी (Student) - नवीन पिढीने आपली दिनचर्या ठरवून घ्यावी. मानसिक शांतीसाठी त्यांनी सकाळी लवकर उठून योगासनं करावीत.

आरोग्य (Health) - जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 04 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार दत्तगुरूंची कृपा; अडकलेली कामं लागणार मार्गी, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकरBaba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
Embed widget