Horoscope Today 02 September 2024 : सप्टेंबर महिन्यातला पहिला सोमवार सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 02 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 02 September 2024 : पंचांगानुसार, आज 02 सप्टेंबर 2024. सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज महिन्यातला पहिला सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
हाती आलेल्या कामाचा फडशा पडाल. थकवा आला तरी तो व्यक्त करणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
प्रकृती स्वास्थ्याकडे आज लक्ष द्यायला हवे. कर्मणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
महिलांना संसारात तडजोड करावी लागेल. क्रोधाचा पारा नियंत्रणात ठेवावा लागणार आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आपली रसिकता चोखंदळपणे जपत संयम आणि संतुलित विचाराचा पाठपुरावा कराल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
घरातील लोकांच्या मताचा आदर करावा लागेल. थोडा अस्थिर आणि चंचल मन होईल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
मनशांती मिळवायची असेल तर ध्यान धारणा करावी लागेल. इष्ट देवतेचा जप निश्चित शांती मिळवून देईल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या लहरी वागणुकीमुळे त्रास होईल. महिला करारी बनतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वडिलोपार्जित घराचे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर येतील. कारखानदारांनी आळस सोडून स्वतंत्र वृत्तीने काम करावे.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
इतरांच्या सहकार्याने कामे करून घ्याल. जे काम कराल त्यातून तुमची वेगळी प्रतिमा दिसून येईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
ठरवलेल्या कामात उशीर झाल्यामुळे नाराज व्हाल. काळ आणि कामाच्या वेळेचे गणित चांगले बसवल्यास फायदा होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी क्रांती करून दाखवावीशी वाटेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
तुम्ही म्हणजे एक समाजप्रिय व्यक्तिमत्व बनाल. इतरांशी मिळून मिसळून वागाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: