(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 02 December 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 02 December 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 02 December 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. विचार न करता कोणत्याही कामात गुंतू नये. जर तुमच्या घरातील दुरुस्तीचं, इंटोरिअरचं काम थांबलं असेल तर तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता. तुम्हाला तुमचा खिसा पाहून खर्च करावा लागेल, कारण तुमच्या जोडीदाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही चांगला पैसा खर्च कराल. कामासोबतच तुम्ही तुमच्या तब्येतीकडेही पूर्ण लक्ष द्यावं.
वृषभ (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामातून नवी ओळख मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोतही वाढतील. काही चढ-उतारानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगलं यश मिळेल. जर तुम्हाला कोणत्याही डीलबद्दल काळजी वाटत असेल, तर ती देखील आज फायनल होऊ शकते. अध्यात्मिक कार्यात तुम्हाला खूप रस असेल.
मिथुन (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धर्मादाय कार्यात सहभागी होऊन नाव कमावण्याचा असेल. तुमचे काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी इत्यादींमध्ये थोडा वेळ घालवाल. कौटुंबिक बाबी घराबाहेर जाऊ देऊ नका.
कर्क (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक काही काम करण्याचा दिवस राहील. आज तुमची निर्णय क्षमता चांगली राहील. जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार केला असेल तर तुम्ही ते करू शकता. तुमच्यासाठी चांगली संधी येऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही तणावात राहाल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता, जे तुमच्यासाठी चांगलं असेल.
सिंह (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तितका चांगला नसेल. तुम्ही दुसऱ्याच्या फंदात पडल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. वाहनांचा वापर जपून करावा, अन्यथा अपघात होऊ शकतो. तुम्हाला कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, त्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं मत घेणं चांगलं राहील. तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी कुठेतरी बाहेर जाऊ शकता.
कन्या (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मजेशीर असणार आहे. तुमचा मूड चांगला असेल, ज्यामुळे तुमचं वर्तन पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही आनंद होईल. लाइफ पार्टनरसोबतचे संबंधही चांगले राहतील. धार्मिक प्रवासाला जाता येईल. रक्ताची नाती अधिक घट्ट होतील. तुम्ही तुमच्या भाऊ किंवा बहिणीकडून कोणतीही मदत मागितली तर ती मदत तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यहारात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच पैशांचा जपून वापर करा. तुमच्या नोकरीबरोबरच तुम्हाला पार्ट टाईम जॉब करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या जुन्या चुकांमधून काहीतरी बोध घ्यावा लागेल. अन्यथा आयुष्यात तुम्ही पुढे जाणार नाही. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही नवीन वाहनाची खरेदी करु शकता. दिवसभरात तुम्हाला आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. विद्यार्थ्यांचं आपल्या अभ्यासात मन चांगलं रमेल. त्यामुळे तुम्हाला मुलांची चिंता भासणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीत महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील एका व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप आनंदात असाल. तसेच, दिवसभर काम करुन तुम्हाला थकवा जाणवेल. अशा वेळी थोड्या वेळासाठी विश्रांती घ्या. तुमच्या घरातील सुख-शांतीमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. या संधीचा योग्य लाभ घ्या. तसेच, आज एखाद्या गरजवंताला मदत करा. यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तसेच, नियोजन केलेलं काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य चांगले असेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती करु शकता. तसेच, तुमच्या जोडीदाराचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभेल. आज कोणाला वचन देताना नीट विचारपूर्वक द्या. कामाच्या ठिकाणी अनेकजण तुमच्या मदतील धावून येऊ शकता.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वर्षातला शेवटचा दिवस असल्या कारणाने तुमचं तुमच्या परीने पूर्ण प्रयत्न करावे लागतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना बाहेर कामाच्या संदर्भात अनेक संधी मिळतील. आज तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर ती देखील तुम्ही करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Aries December Horoscope 2024 : मेष राशीसाठी 31 डिसेंबरपर्यंतचा काळ कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य