एक्स्प्लोर

Horoscope Today 01 August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात करावा लागणार संघर्षाचा सामना; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 01 August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 01 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणतीच भूमिका घेऊ नका. अन्यथा ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला छातीत दुखणं, नैराश्य, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

व्यवसाय (Business) - आज तुम्हाला व्यवसायात जास्त माणसांची गरज भासू शकते. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची तुम्ही लवकरच निवड करावी. 

प्रेमसंबंध (Relationship) - जर तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीबरोबर तुमच्या भावना शेअर करायच्या असतील तर तुम्ही त्या व्यक्त करू शकतात. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय घेताना तुम्ही कोणतीच घाई-गडबड करू नका. अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - जर तुमच्या व्यवसायात एखादं महत्त्वाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. 

युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या मित्राबरोबर वाद होऊ शकतात. जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर काढल्या जाऊ शकतात. पण हा वाद जास्त वाढू देऊ नका अन्यथा तुम्ही मैत्री गमवाल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचे बॉस खूप खुश असतील. तुम्हाला नोकरीत बढतीची संधी देखील मिळू शकते. 

आरोग्य (Health) - ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा. 

व्यवसाय (Business) - जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. कारण याचा तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

युवक (Youth) - जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shrawan Mass 2024 : 'या' दिवसापासून श्रावण मासारंभाला सुरुवात; मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमेसह जाणून घ्या महत्त्वाच्या दिवसांची यादी

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Shani Nakshatra Parivartan : शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Horoscope Today 19 August 2026 : आज बुधवारच्या दिवशी 8 राशींवर असणार टांगती तलवार, फक्त 4 राशींना मिळणार पुण्याचं फळ; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारच्या दिवशी 8 राशींवर असणार टांगती तलवार, फक्त 4 राशींना मिळणार पुण्याचं फळ; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Embed widget