Hanuman Jayanti 2025: राम नवमीनंतर आता हनुमान जयंती अद्भूत! अत्यंत खास योगायोग घडतायत, तारीख, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या..
Hanuman Jayanti 2025: वैदिक पंचांगानुसार, यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी अत्यंत खास आणि शुभ योगायोग घडत आहेत.शुभ योग, तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त, योग्य पूजा पद्धत जाणून घ्या...

Hanuman Jayanti 2025: आज राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. रामजन्मोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी दिसतोय. राम नवमीनंतर हनुमान जयंतीही तितकीच खास आहे. हनुमान जयंती ही शनिवार, 12 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते आणि वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी संपते. यंदाची हनुमान जयंती ही अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी अत्यंत खास आणि शुभ योगायोग घडत आहेत.शुभ योग, तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त, योग्य पूजा पद्धत जाणून घ्या...
हनुमान जयंतीला अनेक शुभ योग निर्माण होतायत...
उत्तर भारतात चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तसेच तामिळनाडूमध्ये मार्गशीर्ष अमावस्येला हनुमान जयंती साजरी केली जाते. कर्नाटकात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावेळी हनुमान जयंतीला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल ते जाणून घ्या..
- पौर्णिमा तिथी सुरू - 12 एप्रिल 2025 पहाटे 03:21 वाजता
- पौर्णिमा तिथी 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 05:51 वाजता संपते.
- मात्र उदयतिथीनुसार, हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी असेल.
- शुभ योगायोग: हा दिवस शनिवार असेल. या दिवशी हस्त नक्षत्र संध्याकाळी 06:08 वाजेपर्यंत राहील.
हनुमान पूजेचा शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:56 ते दुपारी 12:48 दरम्यान
अमृत काळ: सकाळी 11:23 ते दुपारी 01:11 दरम्यान.
गोधूलि मुहूर्त:संध्याकाळी 06:44 ते 07:06 दरम्यान.
संध्यापूजा मुहूर्त: संध्याकाळी 06:45 ते 07:52 दरम्यान.
निशिथ काल मुहूर्त: मध्यरात्री 11:59 ते 12:44 दरम्यान.
सकाळी पूजा मुहूर्त: सकाळी 07.35 ते 09.10
संध्याकाळी पूजेची वेळ: संध्याकाळी 06.45 ते 08.09
भगवान हनुमान पूजेची पद्धत
- सकाळी, स्नान आणि ध्यान केल्यानंतर, उपवास करण्याची आणि पूजेची तयारी करण्याचा संकल्प घ्या.
- हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो, लाल किंवा पिवळ्या कापडाने झाकलेल्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवा.
- मूर्तीला स्नान घाला आणि जर फोटो असेल तर ते पूर्णपणे स्वच्छ करा.
- यानंतर, धूप आणि दिवे लावून पूजा सुरू करा.
- हनुमानजींना तुपाचा दिवा लावा.
- हनुमानजींना अनामिका बोटाने टिळा लावा, शेंदूर अर्पित करा,
- सुगंध, चंदन इत्यादी लावा आणि नंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करा.
- जर तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा असेल तर कच्चे दूध, दही, तूप आणि मध म्हणजेच पंचामृताने अभिषेक करा, नंतर पूजा करा.
- पंचोपचार पूजा व्यवस्थित केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा.
- नैवेद्यात मीठ, मिरची आणि तेल वापरले जात नाही.
- प्रसाद म्हणून गूळ आणि हरभरा नक्की द्या. याशिवाय केशर बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, चुरमा, मालपुआ किंवा मलाईचे पदार्थ अर्पण करा.
- शेवटी, हनुमानजींना प्रार्थना करा आणि त्यांची आरती करा.
- त्यांची आरती केल्यानंतर, त्यांना पुन्हा नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटा.
हेही वाचा..
Navpancham Yog 2025: आज शुक्र-मंगळाची कमाल! जबरदस्त नवपंचम योग केला तयार, तब्बल 'या' 7 राशींना होईल फायदाच फायदा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















