Guru Vakri 2025 : नवीन वर्षात गुरुच्या वक्री चालीने 'या' राशी जगतील टेन्शन फ्री; पैसा, प्रसिद्धी आणि करिअरला मिळणार नवी दिशा?
Guru Vakri 2025 : पंचांगानुसार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी गुरु ग्रह कर्क राशीत वक्री झाले. तर, 5 डिसेंबरपर्यंत याच राशीत वक्री होणार आहे.

Guru Vakri 2025 : वैदिक शास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पती ग्रह जेव्हा पण आपल्या चालीत परिवर्तन करतात तर त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर आणि जगभरात पाहायला मिळतो. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत अतिचारी चाल चालत आहेत. या ठिकाणी ते एक वर्षांपर्यंत असतील. शनिच्या (Shani Dev) अतिचारी बरोबरच देवगुरु बृहस्पतीची दृष्टी अन्य राशींवर देखील पडणार आहे. पंचांगानुसार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी गुरु ग्रह (Guru Vakri) कर्क राशीत वक्री झाले. तर, 5 डिसेंबरपर्यंत याच राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर, 5 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजून 38 मिनिटांनी गुरु मिथुन राशीत प्रवेश करुन पुन्हा वक्री होणार आहे आणि 11 मार्च 2026 रोजी मिथुन राशीत मार्गी होणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाच्या मार्गी चालीमुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर, या राशींना आर्थिक लाभदेखील मिळू शकतो. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
गुरु ग्रहाच्यास मार्गी चालीमुळे मेष राशीसाठी हा काळ फार लाभदायक ठरेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमचा चांगला प्रभाव दिसून येईल. तसेच, तुमची रखडलेली सगळी कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुम्हाला तुमच्या दिर्घकालीन आजारातून मुक्तता मिळू शकते. व्यवसायात तुमची प्रगती होईल. तसेच, वैवाहिक जीवनात मतभेद सुरु असतील तर ते दूर होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी गुरुची वक्री चाल भाग्याची ठरणार आहे. या कालावधीत नशिबाच्या साथीने तुमच्या उत्पन्नात वाढ दिसून येईल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जे तरुण विवाहासाठी इच्छुक आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसून येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या कालावधीत समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. ग्रहांच्या संक्रमणाचा या राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती नांदेल. या कालाधीत तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. पण, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















