Guru Purnima 2022 Wishes : गुरुपौर्णिमेला गुरूंना पाठवा 'या' शुभेच्छा; करा गुरुंचा आदर!
Guru Purnima 2022 Wishes : हिंदू धर्मात गुरूला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती आदर दाखवण्याचा सर्वात खास दिवस आहे.
Guru Purnima 2022 Wishes : आषाढ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हणतात. 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येईल. असे म्हणतात की, या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतल्याने भाग्य वाढते. वेदांचे रचयिता महर्षि वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला. हिंदू धर्मात गुरूला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. गुरुपौर्णिमेला अनेक लोक आपल्या प्रिय गुरूंना विविध वस्तू देतात. गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती आदर दाखवण्याचा सर्वात खास दिवस आहे. गुरूंना या शुभेच्छा पाठवून तुम्ही त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.
"आयुष्यातील प्रत्येक अडचणीत तुम्ही दाखवता मार्ग
जेव्हा एखादी गोष्ट समजत नाही, तेव्हा आठवतात माझे गुरू
धन्य माझे जीवन, तुम्ही माझे गुरु झालात"
गुरुशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्व काही गुरूंनींच दिले आहे
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला उद्धार
आज जे काही आहोत आम्ही, हे तुमचेच उपकार
नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर
हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!
गुरु शिवाय नाही जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार.
गुरु की महिमा है अगम, गाकर तरता शिष्य
गुरु कल का अनुमान कर, गढ़ता आज भविष्य
गुरु को पारस जानिए, करे लौह को स्वर्ण
शिष्य और गुरु जगत में, केवल दो ही वर्ण
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या:
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे..