एक्स्प्लोर

Gudi Padwa 2024 : गुढी कशी उतरावी? गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचं नंतर काय करावं? जाणून घ्या

Gudi Padwa 2024 : ज्या प्रमाणे गुढी उभारताना विधीवत पूजा करुन उभारली जाते, त्याच प्रमाणे गुढी उतरवताना देखील गुढीची विधीवत पूजा केली जाते. कशी ते जाणून घेऊया.

Gudi Padwa 2024 : हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024) सणापासून होते. यंदा उद्या, म्हणजेच 9 एप्रिल 2024 रोजी, मंगळवारी नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी, यशाची गुढी उंचच राहावी, अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते. या दिवशी विधीवत पद्धतीने गुढी उभारणं आणि उतरवणं महत्त्वाचं असतं. गुढी कशी उभारावी हे आपण पाहिलंच, आता ती उतरवायची कशी? जाणून घेऊया.

गुढी कधी उतरावी?

गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते, त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवायची असते. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी 06 वाजून 54 मिनिटं आहे, त्यामुळे त्याआधीच तुम्हाला गुढी उतरावी लागणार आहे. सकाळी गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो, तशाच प्रकारची विधिवत पूजा गुढी उतरवताना करायची असते. 

गुढी कशी उतरावी?

गुढी उतरवताना आरतीचं ताट करुन घ्यावं. ताटात गंध, फुलं,अक्षता, हळदी-कुंकू, निरांजन लावून घ्यायचं आणि उदबत्ती लावायची. गुढी उतरण्याआधी गुढीची पूजा करुन घ्यावी. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू, फुलं वाहून गुढी उतरवली जाते. गुढी उतरवण्याच्या पायऱ्या सविस्तर जाणून घेऊया.

  • सर्वप्रथम गुढीला कुंकू लावा.
  • त्यानंतर गुढीला धूप-दीप दाखवा, अगरबत्ती लावा आणि आरती ओवाळा.
  • यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्या दाखवावा. गुढी उतरवताना तुम्ही साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता.
  • यानंतर गुढीला नमस्कार करा आणि गुढी उतरवा.

गुढी उतरवल्यानंतर गुढीच्या साहित्याचं काय करावं?

गुढी खाली उतरल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळलं जाणं गरजेचं आहे. गुढीला वापरण्यात आलेली कडूलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता. जवळपास असलेल्या नदी किंवा तलावात तुम्ही ते विसर्जित करू शकता. कडुलिंब तुम्ही धान्यामध्ये देखील मिसळू शकता. त्यानंतर साखरेच्या गाठींची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जाते. गुढीला वापरण्यात आलेला कलश तांब्या देव्हाऱ्यात किंवा योग्य ठिकाणी ठेवावा, नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही तो वापरू शकता.

गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाऊज पिस घरातील स्त्रिया वापरू शकतात. गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल, तर ते मंदिरात दान करू शकता. गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून घरात वापरू शकता. रांगोळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावं. तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गायीला अर्पण करावा. 

हेही वाचा:

Gudi Padwa 2024 : गुढी कशी उभारावी? गुढी पूजनात कोणतं साहित्य वापरावं? जाणून घ्या अचूक माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget