Gudi Padwa 2022 : आपल्या देशात अनेक प्रकारचे धार्मिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. यापैकी एक सण म्हणजे गुढी पाडवा. ‘गुढी पाडवा’ (Gudi Padwa 2022) हा असाच एक सण आहे, ज्याच्याशी सनातन धर्माच्या अनेक कथा जोडलेल्या आहेत. तिथीनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला ‘गुढी पाडवा’ साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक श्रद्धा आहेत. या दिवशी ब्रह्म देवाने हे जग निर्माण केले असेही म्हटले जाते. याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी ‘सतयुग’ सुरू झाल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी विशेष पूजा केली जाते.


दुसरीकडे, पौराणिक मान्यतेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीरामांनी बालीचा वध करून दक्षिण भारतातील लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. चला तर, मग आज जाणून घेऊया गुढीपाडवा कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे... 


गुढी पाडवा 2022 तारीख आणि मुहूर्त (Gudi Padwa 2022 Muhurat and Date)


चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी शुक्रवार, 01 एप्रिल रोजी सकाळी 11.53 पासून सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी, 02 एप्रिल, शनिवारी 11:58 वाजेपर्यंत आहे. यंदा गुढीपाडवा 2 एप्रिल रोजी साजरा होणार आहे.


यंदा विशेष योग!


यंदा गुढी पाडव्याला इंद्र योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. अमृत ​​सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग 1 एप्रिल रोजी सकाळी 10.40 ते 2 एप्रिल रोजी सकाळी 6.10पर्यंत आहे. त्याच वेळी 2 एप्रिल रोजी सकाळी 8.31पर्यंत इंद्र योग आहे. दुसरीकडे, नक्षत्राबद्दल बोलायचे झाल्यास, गुढी पाडव्याला रेवती नक्षत्र सकाळी 11.21पर्यंत असून, त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होईल.


गुढी पाडव्याचे महत्व


गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. त्याच वेळी, भारतातील विविध राज्यांमध्ये इतर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुंदर गुढी उभारून, तिची पूजा करतात. असे मानले जाते की, गुढी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.


त्याचबरोबर काही लोक या दिवशी कडुलिंबाची पानेही खातात. यामागची धारणा अशी आहे की, यावेळी निसर्गात बदल होत असतो, त्यामुळे कडुलिंबाची कोवळी पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रोगांच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते आणि शरीर आतून मजबूत होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे देखील वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha