Oscars 2022 : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला 'किंग रिचर्ड' (King Richards) या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान आला आहे. पुरस्कार स्विकारताना विल स्मिथला अश्रू अनावर झाले. पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांनी विल स्मिथला स्टॅडिंग ओवेशन दिले.
विल स्मिथचा 'किंग रिचर्ड्स' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक टेनिसपटू सेरेना, व्हीनस विल्यम्सचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विल स्मिथनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच अनजानु एलिस, सानिया सिडनी, डेमी सिंगलटन, टोनी गोल्डविन आणि जॉन बर्नथल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेनाल्डो मार्कस ग्रीन (Reinaldo Marcus Green) यांनी केलं आहे. ऑस्कर पुरस्कार स्विकारल्यानंतर स्पिच देताना विल म्हणाला, 'कोणतीही कला ही आयुष्याची कॉपी करत असते. मी रिचर्ड विलियम्ससारखा वाटतो.तो क्रेझी फादर आहे, असं वाटतं. '
विलनं मागितली माफी
विलनं स्पिच देताना अॅकॅडमीची माफी देखील मागितली. सोहळ्यामध्ये ख्रिस रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना विल स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. त्यामुळे विलनं त्याच्या कानाखाली मारली. त्यामुळे विलनं अॅकॅडमीची माफी मागितीली, तो म्हणाला, 'माझ्यासोबत नामांकन मिळालेल्या स्पर्धकांची मी माफी मागतो. हे खुप चांगले क्षण आहेत. मी पुरस्कारासाठी रडत नाहीये. '
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी
- ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha