Share Market Updates : शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झाली. प्री-ओपनिंगमध्ये काहीशी सकारात्मक सुरुवात झाली होती. मात्र, बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर त्यात घसरण दिसून आली. आशियाई शेअर बाजार आणि जगातील प्रमुख शेअर बाजारात संमिश्र संकेत दिसून आले. 


आज सेन्सेक्स 110 अंकांनी वधारत उघडला. तर निफ्टी 28 अंकानी किंचीत वधारला.  सेन्सेक्स 57,472 आणि निफ्टी 17,181 अंकावर सुरू झाला. मात्र, त्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 316 अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीत 85 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 17,067.40 अंकांवर ट्रेड करत होता. तर, सेन्सेक्स 57,045.71 अंकावर ट्रे़ड करत आहे. 


निफ्टी 50 मधील 33 स्टॉकच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर 17 शेअर वधारले आहेत. बँक निफ्टीत 315 अंकांची घसरण झाल्याचे दिसून आले. 


निफ्टीतील 'सिप्ला'चा शेअर 2.13 टक्क्यांनी वधारला आहे. बजाज ऑटो 1.93 टक्के, मारूती 0.96 टक्के आणि आयओसीमध्ये 0.84 टक्क्यांनी वधारला आहे. एचएफडीसी लाइफ 1.6 टक्के, कोटक बँकमध्ये 1.38 टक्क्यांनी घसरला आहे. युपीएलमध्ये 1.5 टक्क्यांनी घसरला. 


शुक्रवारी बाजारात घसरण


शुक्रवारी,  शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 223 अंकांनी, तर निफ्टीही 69 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.41 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,362 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,153 वर पोहोचला होता. आशियाई बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.


शुक्रवारी, 1256 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर, 1958 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 91 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha