Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सौरमालेतील सर्व ग्रह ठराविक काळाने इतर ग्रहांबरोबर युती करुन विशेष संयोग बनवतात. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने पडतो. त्यानुसार, 29 मार्च 2025 रोजी 6 शक्तिशाली ग्रह एकत्र मीन राशीत प्रवेश करुन अद्भूत संयोग जुळवून आणणार आहेत. 

Continues below advertisement


ज्योतिष शास्त्रानुसार, राहू आणि शुक्र ग्रह आधीपासूनच मीन राशीत विराजमान आहे. फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रहसुद्धा मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर, ग्रहांचा राजा सूर्याने 14 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला. 28 मार्च रोजी चंद्र आणि 29 मार्च रोजी शनी ग्रह मीन राशीत संक्रमण करणार आहे. अशा प्रकारे मीन राशीत 6 प्रभावशाली ग्रह एकत्र येणार आहेत. यामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मीन राशीत 6 शक्तिशाली ग्रहांचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरु शकते. ज्योतिष शास्त्रानुसार, या संयोगामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पाहायला मिळतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, व्यापारी वर्गाला धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


6 ग्रहांची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची निर्णयक्षेमता अधिक चांगली असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, या काळात तुमचे अनेक ठिकाणी रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


ग्रहांच्या संक्रमणाचा मकर राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही शुभ कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, भाग्याची तुम्हाला चांगली साथ मिळेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात देखील चांगली वाढ पाहायला मिळेल. भावा-बहि‍णींच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. तसेच, तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु शकता. कुटुंबियांबरोबर तुम्ही प्रवासाला जाऊ शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                                


Mauni Amavasya 2025 : बाकी काही नको, अमावस्येला करा फक्त 'हे' 5 उपाय; पितृदोषापासून कायमची मिळेल मुक्ती