Horoscope Today 19 March 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 19 मार्च 2025 हा दिवस सर्व राशींसाठी काही महत्त्वाचे बदल आणि संधी घेऊन येत आहे. ग्रहांची चाल आणि नक्षत्रांची स्थिती यानुसार आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope)


करिअर आणि व्यवसाय: आज तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, परंतु कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी दोनदा विचार करा.
आर्थिक स्थिती: अचानक खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्क राहा.
प्रेम आणि कुटुंब:  जोडीदारासोबत गैरसमज टाळा. संवाद वाढवला तरच नाते दृढ होईल.
आरोग्य: उष्णतेमुळे थकवा येऊ शकतो, भरपूर पाणी प्या.
शुभ उपाय: श्री हनुमान चालीसा पठण करा, आत्मविश्वास वाढेल.


वृषभ रास (Taurus Horoscope) 


करिअर आणि व्यवसाय: तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कार्यशैलीने प्रभावित होतील.
आर्थिक स्थिती: जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
प्रेम आणि कुटुंब: प्रियजनांसोबत वेळ घालवा, त्यांची साथ तुम्हाला मानसिक समाधान देईल.
आरोग्य: पचनाच्या तक्रारी संभवतात, आहारावर विशेष लक्ष द्या.
शुभ उपाय: तुळशीला पाणी अर्पण करा, घरात सकारात्मकता येईल.


मिथुन रास (Gemini Horoscope) 


करिअर आणि व्यवसाय: नवीन जबाबदाऱ्या स्वीकारा, पण कामाचा ताण वाढवू नका.
आर्थिक स्थिती: आकमाईत वाढ होईल. नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
प्रेम आणि कुटुंब: मित्रांशी असलेल्या नात्यात नवा आनंद मिळेल.
आरोग्य: मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि योगा करा.
शुभ उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा, यश मिळेल.


कर्क रास (Cancer Horoscope) 


करिअर आणि व्यवसाय: नवीन प्रकल्प हाती घेण्याचा दिवस नाही. जुन्या गोष्टींचा आढावा घ्या.
आर्थिक स्थिती: धन गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. अचानक आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
प्रेम आणि नातेसंबंध: जोडीदाराच्या भावना समजून घ्या, कौटुंबिक सौख्य टिकेल.
आरोग्य: शरीरास विश्रांती द्या, अनावश्यक चिंता टाळा.
शुभ उपाय: चंद्रदेवाची उपासना करा, मनःशांती लाभेल.


सिंह रास (Leo Horoscope)


करिअर आणि व्यवसाय: नेतृत्वगुणांना वाव देण्याचा दिवस आहे. तुमचे निर्णय महत्त्वपूर्ण ठरतील.
आर्थिक स्थिती: पैशांचा योग्य उपयोग करा, बचत वाढवा.
प्रेम आणि नातेसंबंध: संबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा, गैरसमज निर्माण होऊ शकतो.
आरोग्य: हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.
शुभ उपाय: सुर्यनमस्कार करा, आत्मबल वाढेल.


कन्या रास (Virgo Horoscope)


करिअर आणि व्यवसाय: थोडा संयम ठेवा, कठीण परिश्रमाचे फळ लवकरच मिळेल.
आर्थिक स्थिती: सावधगिरी बाळगावी, अनावश्यक खर्च टाळा.
प्रेम आणि नातेसंबंध: जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.
आरोग्य: सांधेदुखीचा त्रास संभवतो, गरम पाण्याने अंघोळ करा.
शुभ उपाय: देवी महालक्ष्मीची उपासना करा.


तूळ रास (Libra Horoscope) 


करिअर आणि व्यवसाय: नवीन संधी मिळू शकतात, बुद्धीचा योग्य वापर करा.
आर्थिक स्थिती: गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, परंतु तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
प्रेम आणि नातेसंबंध: विवाहयोग संभवतो, प्रेमात नवीन सुरुवात होईल.
आरोग्य: मानसिक शांततेसाठी ध्यान करा.
शुभ उपाय: शुक्रदेवाची उपासना करा.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


करिअर आणि व्यवसाय: आत्मविश्वास वाढेल, स्पर्धात्मक परीस्थितीमध्ये यश मिळेल.
आर्थिक स्थिती: धनप्राप्तीच्या संधी आहेत, त्याचा लाभ घ्या.
प्रेम आणि नातेसंबंध: जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
आरोग्य: उष्णतेशी संबंधित तक्रारी संभवतात.
शुभ उपाय: हनुमान चालीसा पठण करा.


धनु रास (Sagittarius Horoscope) 


करिअर आणि व्यवसाय: नवीन शिकण्याच्या संधी येतील, त्या स्वीकारा.
आर्थिक स्थिती: जुनी येणी वसूल होऊ शकतात.
प्रेम आणि नातेसंबंध: कौटुंबिक स्नेह वाढेल.
आरोग्य: मानसिक तणाव टाळा, ध्यान करा.
शुभ उपाय: गुरु मंत्र जपा.


मकर रास (Capricorn Horoscope) 


करिअर आणि व्यवसाय: कष्टांचे चीज होईल, आत्मविश्वास बळकट होईल.
आर्थिक स्थिती: अचानक धनलाभ संभवतो.
प्रेम आणि नातेसंबंध: जोडीदारासोबत वेळ घालवा.
आरोग्य: सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ उपाय: शनिदेवाची उपासना करा.


कुंभ रास (Aquarius Horoscope) 


करिअर आणि व्यवसाय: नवी कल्पना यशस्वी ठरेल, आत्मविश्वास ठेवा.
आर्थिक स्थिती: गुंतवणुकीसाठी अनुकूल वेळ आहे.
प्रेम आणि नातेसंबंध: घरात सकारात्मक ऊर्जा असेल.
आरोग्य: रक्तदाबाची काळजी घ्या.
शुभ उपाय: भगवान शिवाची पूजा करा.


मीन रास (Pisses Horoscope)


करिअर आणि व्यवसाय: संयम ठेवा, लवकरच यश मिळेल.
आर्थिक स्थिती: खर्चावर नियंत्रण ठेवा.
प्रेम आणि नातेसंबंध: जोडीदारासोबत प्रवासाची शक्यता आहे.
आरोग्य: थंड पदार्थ टाळा.
शुभ उपाय: विष्णूसहस्रनाम पठण करा.


हेही वाचा>>


Lucky Zodiac Sign: 19 मार्च तारीख भाग्याची! 'या' 5 राशींचं होणार चांगभलं, सोन्याचे दिवस येणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)