Mauni Amavasya 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, मौनी म्हणजेच दर्श अमावस्येला (Mauni Amavasya) फार महत्त्व देण्यात आलं आहे. दर्श अमावस्या ही पितरांना समर्पित अमावस्या आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. 


मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करणे, त्यांचं पिंडदान करण्याला फार महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. यामुळे घरात सुख-शांती नांदेत. तसेच, पितृदोष दूर होतात. 


मौनी अमावस्येला करा 'हे' उपाय


पितृदोष दूर करण्यासाठी करा पूजा 


पिंपळाच्या झाडाखाली पितरांचा वास असतो अशी मान्यता आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, त्यावर जल चढवावे आणि दिवा लावावा. तसेच, पितृदोष दूर करण्यासाठी यंत्राची स्थापना करुन पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा करुन ठेवा. या दिवशी काही मंत्रांचा जप केल्याने पितरांना शांती मिळते. 


दान करा


काळ्या तिळाचं दान केल्याने पितरांना शांती मिळते. तसेच, गरीबांना अन्नदान केल्याने पितरांना तृप्ती मिळते. त्याचबरोबर गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य फळ मिळते. तसेच, गाईला चारा खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात. 


श्राद्ध कर्म 


अमावस्येच्या दिशी पितरांच्या नावाने पिंडदान करणं फार शुभ मानलं जातं. दर्श अमावस्येच्या दिवशी विधिवत पूजा करुन श्राद्ध केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती  मिळते. तसेच, पितरांचा आशीर्वाद मिळतो. 


पितरांच्या नावाने करा स्मरण


मौनी अमावस्येला पितरांना स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करा. पितरांच्या नावाने दान करताना पूर्वजांचं नामस्मरण करा. 


मंदिरात करा पूजा 


मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करा. तसेच, भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन प्रार्थना करा. अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                                                         


Shani Gochar 2025 : कर्मफळदाता शनीची बदलणार चाल; 2 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, पदरात पडेल पुण्य