Astrology: 'या' अक्षरांपासून नाव सुरु होणाऱ्या मुली असतात भाग्यवान
Astrology: व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून त्याचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती मिळू शकते.
Astrology: व्यक्तीच्या पहिल्या अक्षरावरून त्याचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती मिळू शकते. शास्त्रानुसार, काही नावे अतिशय भाग्यवान मानली जातात, त्यांचे जीवन अतिशय सुंदर असते. यामुळेच पालक आपल्या मुलाच्या नावाबद्दल खूप गंभीर असतात. मुलींच्या नावांबाबतही गांभीर्य दिसून येते. तर, कोणत्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली भाग्यवान असतात, याबद्दल जाणून घेऊयात.
- ज्या मुलींचे नाव 'D' पासून सुरु होतं, त्या मुली अतिशय निडर असतात आणि सर्व कामे अतिशय कुशलतेने करतात. तसेच या मुली कलात्मकही असतात. एवढेच नव्हेतर शिक्षण क्षेत्रातही त्या यशस्वी ठरतात. या मुली त्यांच्या जबाबदाऱ्या अतिशय प्रमाणिकपणे पार पाडतात. याचबरोबर हातात घेतलेले काम पूर्ण केल्यानंतरच त्या थांबतात.
- ज्या मुलींचे नाव 'P' पासून सुरु होते, या मुली कौशल आणि कठोर परिश्रम घेतात. या मुलींमध्ये एक वेगळीच प्रतिभा असते. त्यांनी वेळीच आपल्यामधील कलागुण ओळखले तर, त्यांची खूप लवकर प्रगती होऊ शकते. पैशाच्या बाबतीतही ते खूप भाग्यवान आहेत.
- 'L' अक्षरापासून नावाची सुरुवात होणाऱ्या मुली प्रत्येक कामात उत्कृष्ट असतात. कुटुंबासोबतच बाहेरच्या जबाबदाऱ्याही त्या पार पाडतात. त्या पैशांची खूप बचत करतात. त्या स्वत:सह इतरांचीही काळजी घेतात. त्यांना धर्मादाय कार्य करायलाही आवडते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Weight Loss Exercise: डाएट करूनही पोटाची चरबी कमी होत नाही? घरीच करा एक्सरसाइज; बेली फॅट लगेच होईल कमी
- Shani Sade Sati 2022: पुढच्या वर्षी कोणत्या राशीवर राहणार शनीची छाया? तर, शनीच्या प्रकोपातून कोणाला मिळणार मुक्ती?
- Diwali 2021 Silver Cleaning Hacks : केमिकलशिवाय चकचकीत करा चांदीची भांडी; 'ही' सोपी पद्धत