Garuda Purana: कलियुगात केलेल्या 'या' पापांमुळे आत्मा थेट नरकात जातो, गरुड पुराणात म्हटलंय...
Garuda Purana Niti Grantha: गरुड पुराणात (Garud Puran) असे सांगितले आहे की, चांगल्या आणि वाईट कर्मांच्या आधारावर मृत्यू दिला जातो.
Garuda Purana Niti Grantha : महर्षि वेद व्यास यांच्या मते चार युगे सांगितली आहेत, त्यानुसार सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आहेत. ही युगे सतयुगापासून सुरू होतात आणि कलियुगात संपतात. कलियुग संदर्भात सर्व प्रकारची भविष्यवाणी (Astrology) करण्यात आली आहे. गरुड पुराणात (Garud Puran) कलियुगात मानवाने केलेली पापे आणि त्याची शिक्षा याबद्दल उल्लेख आहे.
भगवान विष्णू गरुडाला सांगतात...गरुड पुराण
भगवान विष्णू आपले वाहन पक्षी गरुड यांच्याशी संवाद साधताना धर्म, कर्म, नीती, नियम आणि पाप आणि पुण्य यांच्या आधारे मृत्यूनंतर स्वर्ग-नरक याविषयी बोलतात, ज्याला गरुड पुराण म्हणतात.
गरुड पुराणात कलियुगात केलेली वाईट पापे कोणती?
भगवान विष्णूने गरुड पुराणात कलियुगात केलेली अशी वाईट पापे सांगितली आहेत, ती करणार्या व्यक्तीला मृत्यूनंतर थेट नरकात जावे लागते आणि त्याला कठोर यातना सहन कराव्या लागतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की, ही वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला नरकात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.
कलियुगातील 'ती' पापे जी माणसाला थेट नरकात घेऊन जातात
-देवाची सेवा करणाऱ्या ब्राह्मणांना मारणारे आणि भ्रूणहत्या करणारे मृत्यूनंतर नरकात जातात.
-गर्भवती महिलेला मारणाऱ्याला नरकात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.
-विश्वासघातानंतर विष देऊन खून करणाऱ्यांनाही मृत्यूनंतर नरकात जावे लागते.
-धार्मिक ग्रंथ, धर्मग्रंथ आणि वेद-पुराणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोकही नरकात जातात आणि शिक्षा भोगतात.
-जे घरी आलेल्या पाहुण्यांचा अनादर करतात आणि भुकेल्यांना अन्न-पाणी देत नाहीत, त्यांनाही नरकाच्या वाटेला जावे लागते.
-जे लोक अनोळखी स्त्री किंवा पुरुषाशी संबंध ठेवतात त्यांचा आत्मा मृत्यूनंतर नरकात जातो.
-अशक्त किंवा असहाय्यांचा छळ करणारे असे लोक थेट नरकात जातात.
-महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना आणि या दुष्कर्मात साथ देणाऱ्यांनाही मृत्यूनंतर थेट नरकात जावे लागते.
-जे लोक निरपराध्याविरुद्ध खोटी साक्ष देतात ते थेट नरकात जातात आणि कठोर शिक्षा भोगतात.
-ज्याला पंचदेव महादेव, श्री हरी विष्णू, सूर्यदेव, भगवान गणेश आणि देवी दुर्गा यांचे भय नाही, त्यांची पूजा न करणाऱ्या व्यक्तीला नरकाच्या मार्गात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.
-जे लोक वैयक्तिक फायद्यासाठी प्राण्यांचा बळी देतात, ते देखील मृत्यूनंतर नरकात जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Garuda Purana : मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला दिसतात 'हे' सहा संकेत