Garuda Purana Wealth Mantra : गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक मानले जाते. तसेच, हा वैष्णव पंथाशी संबंधित एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये पाप आणि पुण्य, कर्म, नरक, स्वर्ग, पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरची अवस्था अगदी सविस्तरपणे सांगितली आहे.


प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात कधी पैशाची कमतरता भासू नये, असं वाटत असतं.  आर्थिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पण अनेक वेळा कष्ट करूनही गरिबी कायम राहते. गरुड पुराण (Garud Puran) जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मूलमंत्र सांगते, जे व्यक्तीने पाळल्यास तो मालामाल होऊ शकतो. 


जर तुम्ही गरुड पुराणात सांगितल्या गेलेल्या गोष्टींचं पालन केलं तर पैशाशी संबंधित समस्या नक्कीच दूर होतील आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आर्थिक जीवन सुसह्य करण्यासाठी नेमक्या कोणत्या सवयी अंगीकाराव्या? जाणून घेऊया.


आर्थिक प्रगतीसाठी 'या' 5 सवयी अंगीकारा


दानधर्म करा


गरुड पुराणानुसार, जे आपल्या कमाईचा काही भाग दान करतात आणि धार्मिक कार्यात खर्च करतात, त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे फार पुण्याचं काम आहे, जे केल्याने गरीब माणूसही हळूहळू करोडपती बनू शकतो. जो व्यक्ती दानधर्म करत नाही, त्याला नेहमीच पैशांची कमतरता भासते.


संपत्तीची बढाई मारू नका 


पैसे कमवणं तर सोपं असतं, पण तितकंच अवघड असतं पैसे टिकवणं. जे लोक आपल्या संपत्तीची बढाई मारत नाहीत आणि आपली संपत्ती दाखवत नाहीत, तिचा दिखावा करत नाहीत, त्यांच्या घरात देवी लक्ष्मी नेहमी वास करते. धनाची बढाई मारणाऱ्यांवर लक्ष्मी कोपते, असं गरुड पुराणं सांगतं.


कुणाचीही उधारी ठेवू नका


उधार घेतलेले पैसे नेहमी पूर्ण फेडले पाहिजेत. धनाचा लोभ, फसवणूक किंवा चोरी करणाऱ्यांसोबत लक्ष्मी कधीच राहत नाह, असं गरुड पुराण सांगतं. पैशांच्या बाबतीत लोकांची फसवणूक टाळली पाहिजे, तरच तुम्ही आर्थिकदृष्ट्या ताकदवान बनाल.


घाणेरडी वागणूक ठेवू नका


कुचैलीनं दंतमलोपधारीनं ब्रह्वाशीनं निस्तुर्वाक्यभाषीनं। सूर्योदये हिस्त्मयेपि शयिनां विमुंचति श्रीरापि चक्रपाणीम् ।


गरुड पुराणात लिहिलेल्या या श्लोकानुसार, जे लोक घाणेरडे कपडे घालतात, दात घासत नाहीत, वाटेल ते खातात, बोलताना कठोर शब्द वापरतात आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतात त्यांच्या घरी लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी बनू शकतात. विचारांमध्ये शुद्धता आणि वाणीत संयम ठेवणाऱ्यांवर देवी लक्ष्मी नेहमी कृपा करते.


तुळशीची पूजा करा


तुळशीची नित्य पूजा करावी. ज्या घरात रोज तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि त्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच अशा घरात कधीही पैशाची, धनाची कमतरता भासत नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Garud Puran : मृत्यूच्या तासाभरापूर्वी दिसू लागतात 'या' 5 गोष्टी; आधीच मिळतात संकेत, गरुड पुराण सांगते...