Garud Puran : माणसाच्या जीवनात मृत्यू ही एक अशी घटना आहे जी अटळ आहे, ती कोणीच टाळू शकत नाही. आपण आज आहोत, तर उद्या नाही. एखाद्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण कधी येईल हे सांगता येत नाही. अशात, गरुड पुराणात (Garud Puran) मृत्यूबद्दल काही गोष्टी विस्तारानं सांगण्यात आल्या आहेत. जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या दारात उभा असतो, तेव्हा त्याला काही गोष्टींचा आभास होतो.
आपल्याला आयुष्याचा अखेरचा श्वास घेण्याच्या तासाभरापूर्वी मृत्यूची पूर्वकल्पना आलेली असते. मरणापूर्वीच्या शेवटच्या क्षणांत नक्की काय घडतं? जाणून घ्या सविस्तर...
मृत्यूपूर्वी दिसू लागतात पूर्वज
गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे, एखादी व्यक्ती जेव्हा शेवटचा श्वास घेत असते, तेव्हा त्याला आपल्या जवळची मरण पावलेली माणसं दिसू लागतात. व्यक्तीला असं वाटतं की, घरातील मरण पावलेल्या व्यक्ती आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे बोलवत आहेत. जेव्हा मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीला असे संकेत मिळतात, त्यावेळी ते आपली शेवटची इच्छा व्यक्त करू शकतात.
सावली देखील सोडते साथ
जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसाची सावली गायब होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शेवटचे क्षण जवळ येतात तेव्हा त्याला पाणी, तूप किंवा तेलात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. जेव्हा हे घडतं तेव्हा लगेच समजून घ्या की तुमच्याजवळ आता जास्त वेळ शिल्लक नाही.
दिसू लागतात यमदूत
जेव्हा व्यक्ती अखेरचा घटका मोजत असतो तेव्हा त्याला गडद रंगाच्या सावलीत यमदूत दिसू लागतात, जे त्याला त्यांच्याकडे बोलवत असतात. वास्तविक हे यमदूत त्या व्यक्तीचा आत्मा सोबत घेऊन जाण्यासाठी येतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूला यमदूतांची उपस्थिती जाणवू लागते, तेव्हा त्याने समजून घेतलं पाहिजे की त्याच्या जीवनाचे अवघे काही मिनिट शिल्लक आहेत.
मरणापूर्वी दिसू लागतं रहस्यमयी दार
जेव्हा एखादी व्यक्ती श्वास सोडू लागते तेव्हा तिला एक प्रकारचा रहस्यमयी दरवाजा दिसू लागतो. काहींना त्या दरवाजातून प्रकाशकिरणं बाहेर पडताना दिसतात, तर काहींना त्या दरवाजातून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसतात. जर एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल आणि तिला असं काही दिसलं तर कुटुंबाने समजून घ्यावं की ती व्यक्ती तिच्या जीवनाचे अखेरचे क्षण मोजत आहे.
आयुष्यभराते चांगले-वाईट कर्म आठवू लागतात
व्यक्तीला आपल्या शेवटच्या क्षणांत आपण केलेले सर्व चांगले-वाईट कर्म आठवू लागतात. त्या व्यक्तीला समजू लागतं की आता त्याच्याकडे फार कमी वेळ राहिला आहे, अशा वेळी तो आपल्या शेवटच्या इच्छा कुटुंबाकडे व्यक्त करू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :