Imaran Khan : बॉलीवूड अभिनेता इमरान खान (Imaran Khan) जवळपास एक दशकाने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्याच्या या कमबॅकसाठी त्याला त्याच्या मामाचा म्हणजेच आमिर खानचा (Aamir Khan) सपोर्ट मिळाला आहे. आमिर खानचा भाचा इमरान खानने 2008 मध्ये जेव्हा त्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याची स्पर्धा रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) होती.
इमरान खानने आपल्या मामाच्या प्रोडक्शन हाऊसकडून बनवण्यात आलेल्या जाने तू या जाने ना या सिनेमातून ब़ॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या या पदार्पणातच प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरला आणि त्याच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या. इमरानचा डेल्ही बेली हा सिनेमा कॉमेडीच्या बाबतीत एक कल्ट सिनेमा मानलं जातं. पण 2015 मध्ये त्याच्या कंगनासोबत आलेला कट्टी बट्टी हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर इमरानने त्याचं अभिनय क्षेत्र सोडून दिलं.
सलग दिले फ्लॉप सिनेमे
इमरान खानचे मटरु की बिजली का मंडोला, गोरी तेरे प्यार में, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा आणि कट्टी बट्टी हे सिनेमे सलग आले आणि ते फ्लॉप झाले. पण पुन्हा एकदा इमरान मोठ्या पडद्यासाठी सज्ज झालाय. पीपिंग मूनच्या रिपोर्टनुसार, इमरान खानचा मामा आमिर खान एका कॉमेडी सिनेमाची निर्मिती करणार आहे. त्यामध्ये इमरान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॅप्पी पटेल असं त्याच्या पात्राचं नाव आहे.
सहकलाकार करणार दिग्दर्शन
रिपोर्ट्सनुसार, ही एक पूर्णपणे कॉमेडी सिनेमा आहे. यामध्ये कॉमेडियन आणि अभिनेते वीर दास या सिनेमाचे दिग्दर्शक असणार आहेत. वीर दास हे डेल्ही बेलीमध्ये इमरानचा तो सहकलाकार होता. तसेच वीर दास त्यांच्या या सिनेमात धमाकेदार कॉमेडी घेऊन येणार असल्याचंही सांगितलं जातंय. या सिनेमाचं शूट गोव्यामध्ये सुरुही झालंय.
सीरिजमधून करणार होता कमबॅक
याआधी एका मुलाखतीमध्ये इमरानने म्हटलं होतं की, तो डीज्नी प्लस हॉटस्टारच्या एका स्पाय सीरिजमधून कमबॅक करणार आहेत. पण मागील वर्षी जिओने डीज्नीला टेकओवर केलं आणि हे प्रोजेक्ट बंद पडलं. त्यानंतर आता इमरान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे त्याचे चाहते देखील त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.