Ganga Saptami 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला गंगा सप्तमी (Ganga Saptami) साजरी करण्यात येते. आज गंगा (Ganga) सप्तमीचा शुभ दिवस आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी गंगा नदी धरतीवर प्रकट झाली होती. यासाठीच आजच्या दिवशी गंगेची पूजा केली जाते. अनेकजण या दिवशी गंगेत स्नान करतात. गरजूंना दान-पुण्य करतात.यामुळे शुभ परिणाम मिळतात. असं म्हणतात की हे उपाय केल्याने व्यक्तीची अनेक दु:ख, संकटांपासून सुटका होते. आणि अनेक पुण्य फळं मिळतात. तर, जाणून घेऊयात आजच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये.
गंगा सप्तमीचा शुभ मुहूर्त (Ganga Saptami 2024 Shubh Muhurta)
हिंदू पंचांगानुसार गंगा सप्तमीची सुरुवात 13 मे 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु झाला असून आज (14 मे 2024) रोजी संध्याकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी संपणार आहे.
गंगा सप्तमीच्या दिवशी काय करावं?
गंगा सप्तमीच्या दिवशी गंगेची विधिवत पूजा करावी. तसेच, गंगेच्या आरतीत सहभागी व्हावे. शक्य असल्यास या दिवशी निर्जल उपवास किंवा फलाहार घ्यावा. आजच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणं फार शुभ मानलं जातं. या दिवशी दान करणं फार शुभ मानलं जातं. तसेच, गंगा सप्तमीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूजा आणि आराधना-उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे.
गंगा सप्तमीच्या दिवशी काय करू नये?
हिंदू धर्म मान्यतेनुसार, गंगा सप्तमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मांस, मदय यांसारख्या तामसिक अन्नाचं सेवन अजिबात करू नये. या दिवशी ज्येष्ठांचा आदर करावा. त्यांना चुकीची वागणूक देऊ नये. तसेच, नकारात्मक विचारांपासून दूर राहावं. उपवासात झोपणं टाळावं. तसेच, कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. भांडणं टाळा. तसेच, या दिवशी सर्वांना समान वागणूक द्या.
गंगा स्नान मंत्र (Ganga Snan Mantra)
या दिवशी गंगेत स्नान करताना 'ॐ नमो भगवति हिलि हिलि मिलि मिलि गंगे मां पावय पावय स्वाहा' या मंत्राचा जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :