Astrology : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. या तिथीला गंगा सप्तमी तिथी व्रत पाळले जाते. तसेच, चंद्र स्वत:च्या राशीत (Horoscope) भ्रमण करत आहे. गंगा सप्तमी व्रताच्या दिवशी वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि पुष्य नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गंगा सप्तमीच्या दिवशी 5 राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल. या राशीच्या लोकांच्या कमाईत चांगली वाढ होईल. तसेच, या राशींच्या लोकांवर हनुमानाचा आशीर्वादही मिळणार आहे. आजच्या दिवशी कोणत्या राशी (Zodiac Signs) सर्वात भाग्यवान आहेत ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज या राशीचे लोक आपलं मत चारचौघांसमोर उघडपणे मांडू शकतील. तसेच, सर्व प्रकारच्या समस्यांना धैर्याने सामोरे जातील.आजच्या दिवशी तुम्ही समाधानी असाल. तसेच, पैसेही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये समाधान मिळेल. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 


सिंह रास (Leo Horoscope)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. तुम्ही तुमच्या कामावर पूर्णपणे फोकस कराल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल. व्यापारी वर्ग आपल्या व्यवसायात खुश असतील. नवीन वाहन खरेदीचाही चांगला दिवस आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा असेल.आज नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल. तुमच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल. आज व्यवसायिकांसाठी चांगली लाभाची परिस्थिती आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही अगदी चांगल्या पार पाडाल. धार्मिक कार्यामध्ये तुमचा उत्साह असेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांना आज हनुमानाच्या कृपेने सर्व चिंता आणि संकटांपासून मुक्ती मिळेल. जीनालाचा खरा अर्थ तुम्हाला आज उमगेल. तुमच्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असेल. तसेच या राशीचे लोक उच्च शिक्षणासाठी परदेशात जातील. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना आज कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कामावर तुम्ही समाधानी असाल. तुम्हाला स्वत:चा नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्यास तुम्ही तो करू शकता. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीचे लोक आज सोन्या-चांदीची खरेदी करू शकतात. तुमचे घर सुख-समृद्धीने भरून जाईल. तसेच, तुमचं व्यक्तिमत्त्वही सुधारेल. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर भगवान हनुमानाच्या कृपेने तुम्हाला चांगली नोकरीची संधी मिळेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांबरोबरचा तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात चांगले बदल घडून येतील. नवीन जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडू शकाल.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : तब्बल 200 वर्षांनंतर शनीचं पूर्वा भाद्रपद नक्षत्रात परिवर्तन; 'या' 3 राशींकडे येणार चिक्कार पैसा, पद आणि प्रतिष्ठेतही होईल वाढ